लोकसभा निवडणुकीत वंचितचा फॅक्टर जनतेने नाकारलं; उमेदवारांना पाच ते पंधरा हजार मते
मुंबई वॉच : प्रतिनिधी महादू पवार-(मुंबई) मागील लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीने ४० लाख मते घेऊन अनेक उमेदवार दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर मते घेतली असताना या लोकसभा निवडणुकीत वंचित फॅक्टर कमाल करेल, असे वाटले असतानाच महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या बाजूनेच जनतेने कौल दिल्याने या निवडणुकीत अँड .बाळासाहेब आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टर संपुष्टात आला आहे. बाळासाहेब आंबेडकर यांना अकोल्यात अडीच लाख मते घेऊनही तिसऱ्या क्रमांकावर पराजित झाले तर महाराष्ट्रातील विविध लोकसभा मतदारसंघांमध्ये वंचित आघाडीच्या उमेदवारांना पाच ते पंधरा हजार सरासरी मते पडल्याने वंचित फॅक्टर जनतेनेच नाकारल्याचे स्पष्ट झाले.
मागील लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने ४० लाख मते घेतल्याने या लोकसभा निवडणुकीत बाळासाहेब आंबेडकर यांना मते घेऊन महाविकास आघाडीला पराजित करतील, असा व्यक्त केलेला अंदाज फोल ठरला आहे. गेली दहा वर्ष वंचित आघाडी महाराष्ट्राच्या राजकारणात दखलपात्र ठरली होती. मात्र महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्षाने सविधान बचावचे अभियान चालविल्याने त्याला दलित आणि मुस्लिम मतदारांनी भरभरून साथ दिली. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने ४८ पैकी ३० लोकसभा मतदारसंघात बाजी मारली. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीकडे हक्काच्या मतदारांनीच पाठ फिरवल्याने आता प्रकाश आंबेडकर यांना नवी राजकीय रणनीती
आखावी लागणार आहे. महाराष्ट्रातील वंचितचे सर्व मतदान महाविकास आघाडीकडे वळल्याने वंचित आघाडी फॅक्टर संपुष्टात आला आहे. आता प्रकाश आंबेडकर आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.