सावित्री खाडीपात्रातील अनधिकृत वाळू उत्खननावर तीस लाखाची दंडात्मक कारवाई

 

महाड – (मिलिंद माने)  महाड जवळील सावित्री खाडीपात्रात मुठवली व केंबुर्ली या दोन काणी जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी केलेल्या धडक कारवाईनंतर अनाधिकृत वाळू उपशावर सुमारे 30 लाखाची दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याचे महाड तहसीलदार महेश शितोळे यांनी सांगितले.

महाड जवळील सावित्री खाडीमध्ये १ मे महाराष्ट्र दिन रात्रीच्या सुमारास जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांच्या पथकाने अनधिकृतरित्या वाळू उपसा करणाऱ्या मुठवली तसेच केंबुर्ली येथील वाळू डेपोवर अचानक टाकलेल्या धाडी मध्ये अनधिकृत वाळू साठ्यावर कारवाई केली आहे. मुठवली येथील ओरिएंटल लिमिटेड कंपनी व्यवस्थापना विरोधात व या कंपनीबरोबर ज्या शेतकऱ्यांनी जागेचा करारनामा केलेला आहे त्यांच्या विरोधात १३० ब्रास अनधिकृत वाळू उत्खननाचा वाळू साठा जप्त केला असल्याची माहिती तहसीलदार महेश शितोळे यांनी दिली. या ठिकाणी पंचनामा केल्यानंतर फक्त १३० ब्रास . अनंतकृत वाळू साठा सापडला असून यावर तीस लाखाची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

या ठिकाणी जवळपास 130 ब्रास वाळू अनधिकृत रित्या सापडलेले आहे यावर कारवाई करण्यात आली असून सुमारे 30 लाख रुपये दंड बसवण्यात आला आहे अन्य ठिकाणी देखील अशाच प्रकारे कारवाई केली जाईल : महेश शितोळे तहसीलदार महाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *