अनेक प्रश्नांचा एकच उत्तर – प्रभाग ३ साठी राजू विश्वकर्मा का?

मीरा-भाईंदर : प्रभाग क्रमांक ३ मधून नगरसेवक म्हणून राजू विश्वकर्मा यांचे नाव नागरिकांमध्ये चर्चेत आहे. गेल्या अनेक वर्षांत कोणतेही पद नसताना सामाजिक बांधिलकीतून त्यांनी केलेल्या कामांमुळे त्यांना नागरिकांचा व्यापक पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे.

 

प्रभागात कुणावरही कोणतीही आपत्ती आली, की नागरिकांनी सर्वप्रथम राजू विश्वकर्मा यांच्याकडे धाव घेतली. जात-धर्म न पाहता त्यांनी नेहमीच मदतीचा हात पुढे केल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. दुकानदार, फेरीवाले व हातगाडीवाल्यांना त्रास देण्याचे प्रकार घडल्यास त्यांनी थेट हस्तक्षेप करून संबंधितांना संरक्षण दिले.

 

कोरोना महामारीच्या भीषण काळात राजू विश्वकर्मा यांनी हजारो नागरिकांना दिवसातून दोन वेळा मोफत अन्न वाटप केले. क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल रुग्णांना तब्बल महिनाभर दोन वेळचे जेवण व नाश्ता मोफत देण्यात आला. याच काळात डॉक्टर, परिचारिका, महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठीही भोजन व्यवस्था करण्यात आली. तसेच गरजू कुटुंबांना रेशन वाटप करून कुणीही उपाशी झोपू नये याची दक्षता घेतली.

 

कोरोना काळात नागरिक घराबाहेर पडू नयेत यासाठी संपूर्ण भाईंदर परिसरात रस्त्यांवर जनजागृतीपर संदेश लिहून जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली. शाळा बंद असतानाही खासगी शाळांकडून फी वसुलीचा तगादा सुरू झाल्यानंतर, भयंदर पश्चिम येथील सुभाषचंद्र बोस मैदानात नऊ दिवस आमरण उपोषण करून तब्बल ४५ टक्के फी माफी मिळवून देण्यात आली.

 

शिक्षणाचा अधिकार कायदा २०११ व २०१३ अंतर्गत मुलांच्या मूलभूत हक्कांसाठी ते सातत्याने लढत असून, महापालिकेतील कथित भ्रष्ट व अकार्यक्षम अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधातही त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे. या मागण्यांसाठी कस्तुरी पार्क येथे १९ दिवस आमरण उपोषणही करण्यात आले होते.

 

प्रभागातील गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, गरबा तसेच इतर सण-उत्सवांत त्यांनी सक्रिय सहभाग घेत आर्थिक मदतही केली आहे. कोणतेही अधिकृत पद नसतानाही इतकी कामे केल्यामुळे, नगरसेवक म्हणून निवडून आल्यास पाणी, रस्ते, गटार, आरोग्य, शिक्षण व सुरक्षा या मूलभूत सुविधांसाठी ठोस आणि प्रभावी कामकाज होईल, असा विश्वास समर्थक व्यक्त करत आहेत.

 

दशकानुदशके पदावर राहूनही समस्या सोडवण्यात अपयशी ठरलेल्या नगरसेवकांना बाजूला सारून, समाजासाठी झटणाऱ्या राजू विश्वकर्मा यांना संधी देण्याची गरज असल्याची भावना प्रभागात व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *