मुंबई – देशाच्या औद्योगिक राजधानी मुंबईत शेकडो सामाजिक संस्था असल्या तरी खऱ्या अर्थाने गरजूंना नेहमीच मदत करणाऱ्या संस्थांमध्ये आपला रुपेश फाऊंडेशनचे नाव अग्रस्थानी आहे. कोणीही गरीब उपाशी राहू नये यासाठी संस्थेतर्फे वेळोवेळी रेशनचे वाटप करण्यात येत आहे व गरजू महिलांना देवस्थानचे दर्शन देणे व महिलांना वेळोवेळी साड्यांचे वाटप करणे व ही सर्व मदत जात, धर्म, प्रादेशिक भेद लक्षात न ठेवता केली जात आहे. जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी मुंबईतील मस्जिद बंदर येथील आपला रुपेश फाउंडेशनच्या कार्यालयात समाजात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला.
आपला रुपेश फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ.प्रिया रुपेश पाटील यांनी कोरोनाच्या काळात निस्वार्थीपणे जनतेची सेवा करणाऱ्या डॉ. फातिमा सारंग, लोकांच्या हक्कासाठी सदैव लढणाऱ्या ॲडव्होकेट नाझिया भालदार, सौ भारती पाके. अंगणवाडी सेविका रेखा सुरकरण आणि मोफत योग वर्ग चालवून लोकांना निरोगी ठेवणाऱ्या योग शिक्षिका शिल्पा चरणिया यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. महिला दिनाला उपस्थित शेकडो महिलांनी जागतिक महिला दिनानिमित्त केक कापून कार्यक्रमाची सुरुवात केली. सन्मानित झालेल्या सर्व महिला समाजात उत्कृष्ट कार्य करून लोकांना मदत करत आहेत. आपला रुपेश फाऊंडेशनच्या अध्यक्षा प्रिया रुपेश पाटील यांनी उपस्थित सर्व महिलांचे स्वागत केले व आभारही व्यक्त केले. सन्मानित महिलांनी आपला रुपेश फाउंडेशनचे स्वागत केल्याबद्दल आभार मानले.