महाड (मिलिंद माने) महाड दापोली राज्य मार्ग सुस्थितीत असताना देखील त्यावरती डांबर टाकून ग्रिट मारण्याच्या प्रकारामुळे मे महिन्यापासून चालू झालेली अपघाताची मालिका ही रस्त्याचे देखभाल दुरुस्ती करणाऱ्या एसएमसी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या बे जबाबदार धोरणामुळे रस्त्यावर येणाऱ्या पाण्यामुळे कुरले घाटात अपघाताचा धोका निर्माण झाला आहे याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र सुस्त अवस्थेत असून वाहतूकदारांच्या जीवाशी खेळण्याचा अजब प्रकार एसएमसी कन्स्ट्रक्शन कंपनीकडून होत असल्याचे उघड झाले आहे
याबाबत अधिक माहिती अशी की महाड दापोली राज्य मार्गाच्या देखभाल दुरुस्तीचे कंत्राट एसएमसी कन्स्ट्रक्शन कंपनीकडे तब्बल दहा वर्षे आहे रस्ता बनवण्यापासून त्यावरील देखभाल दुरुस्ती खड्डे व साईड पट्ट्यांचे मजबुतीकरण व साईड पट्ट्यांवर उगवणारी जंगली झुडपे काढून रस्ता सुस्थितीत ठेवणे ही या कंपनीची जबाबदारी आहे मात्र महाड जवळील कुरले घाटात अवघड वळणावर असणाऱ्या साळुंखे माइल स्टोन या कारखान्याजवळ रस्त्यावरील डोंगरावरील पाण्याबरोबर वाहून येणाऱ्या मातीने गटार भरल्याने या गटातील पाणी साईड पट्टीवरून रस्त्यावर येत असल्याने या पाण्याचा उपयोग रस्त्यावरून जाणारे येणारे वाहन चालक आपली पावसात खराब झालेली वाहने स्वच्छ धुण्यासाठी या पाण्याचा वापर करून रस्त्यावर अपघाताला निमंत्रण देत असल्याचे चित्र प्रत्यक्ष पाहण्यास मिळत आहे
महाड सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता योगेश सदाफुले यांना याबाबत वारंवार कल्पना देऊन देखील त्यांनी यशस्वी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या व्यवस्थापकाकडे सदरच्या रस्त्यावर येणारे गटारातील पाणी बंद करण्याबाबत कार्यवाही करण्यास तत्परता दाखवत नसल्याने या गटारातील पाणी रस्त्यावर येऊन वाहने घसरण्याचा धोका निर्माण झाला आहे या ठिकाणी असणारी धोकादायक वळणे व या वळणावर रस्त्यावर पसरत असलेले पाणी पाहता मोठा अपघात झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे मात्र एसएमसी कन्स्ट्रक्शन कंपनीवर मेहरबान झालेल्या सार्वजनिक बांधकाम उपविभाग महाड यांना रस्त्यावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यात फारश्य नसल्याचे या निमित्ताने अधोरेखित होत आहे