मुंबई, ११ ऑगस्ट – मुंबई शहराच्या सामाजिक व शैक्षणिक ,वैद्यकीय इतिहासात अमीट ठसा उमटवणारे, भारतीय रेल्वेचे जनक व स्त्रीशिक्षणाचे अग्रदूत जगन्नाथ (नाना) शंकर शेठ यांच्या तैलचित्राचे अनावरण जे. जे. रुग्णालयाच्या म्युझियममध्ये करण्यात आले. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार यांच्या हस्ते हा अनावरण सोहळा पार पडला.
१८३८ साली स्थापन झालेल्या सर जे. जे. ग्रँट मेडिकल कॉलेजच्या स्थापनेमध्ये नानांचे मोठे योगदान होते. त्या ऐतिहासिक भूमीवर नानांचे तैलचित्र प्रदर्शित झाल्यामुळे उपस्थितांमध्ये खास उत्साहाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमात अखिल भारतीय परिषदचे अध्यक्ष डॉ. गजानन रत्नपारखी, डॉ. रणजित मानकेशवर, डॉ. छाया वळवी, डॉ. गजानन चव्हाण, डॉ. संजय सुरासे, डॉ. रेवत, तसेच प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष दिनकर बायकेरीकर, शंकर शेठ कुटुंबीय, मुंबई मनपाचे निवृत्त उपायुक्त उदयकुमार शिरूरकर, ॲड. सच्चिदानंद हाटकर, दिलीप मालंणकर, अजित पितळे, संजय पितळे, सुनील देवरुखकर, नाना प्रेमी आणि रुग्णालयातील डॉक्टर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी नानांचे तैलचित्र साकारणारे चित्रकार प्रकाश सोनवणे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोषाध्यक्ष चंद्रशेखर दाभोळकर यांनी केले.
प्रास्ताविक करताना प्रतिष्ठानचे सरचिटणीस ॲड. मनमोहन चोणकर म्हणाले, “नानांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रुग्णालयाच्या परिसरात त्यांचे स्मृतिचिन्ह उमटविण्याचा हा उपक्रम रुग्णालय प्रशासनाच्या सहकार्यामुळे यशस्वी झाला आहे.” त्यांनी यावेळी