भाजपा गटनेते आ. दरेकरांच्या उपस्थितीत असंख्य तरुणांचा भाजपात जाहीर प्रवेश

मुंबई – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर प्रेरित होत आज असंख्य तरुणांनी भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला. भाजपा मागाठाणे वॉर्ड क्रमांक ०३ चे वॉर्ड अध्यक्ष नीकेश तळेकर यांच्या पुढाकाराने हा पक्ष प्रवेश पार पडला.

 

नवीन श्याम शेट्टी प्रतिष्ठानचे नितीन शेट्टी, विशाल पारेख, पप्पू गुप्ता, ब्रिजेश यादव, मुकाद्दर खान, विनोद यादव, संतोष बच्चे, योगेश जिंजाळ यांनी तर ओमकार बॉईजमधून आकाश देवकाने, अनुराग म्हात्रे, रंजित जाधव, अक्रम खान, नारायण गोरे अशा असंख्य तरुण कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपात जाहीर प्रवेश केला. यावेळी भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी भाजपचा झेंडा हाती देऊन तरुण, उत्साही कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेश करवून घेतला. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. याप्रसंगी मुंबई भाजपा उपाध्यक्ष प्रकाश दरेकर, उत्तर मुंबईचे जिल्हा सचिव मोतीभाई देसाई, मंडळ अध्यक्ष अमित उत्तेकर, मंडळ महामंत्री ललित शुक्ला, मंडळ महामंत्री कृष्णा दरेकर यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *