मुंबई (मिलिंद माने) राज्याची राजधानी असणारा मुंबईतील मंत्रालय सर्वसामान्यांना आता १५ ऑगस्ट पासून. सहजासहजी प्रवेश मिळणे अशक्य होणार आहे कारण १५ ऑगस्ट पासून . सर्वसामान्य जनतेला मंत्र्यांच्या दालनात जाणे आता अशक्य होणार आहे
राज्यातील सर्व सामान्य जनतेची स्थानिक ,तालुका व जिल्हा पातळीवरील कामे रखडल्यानंतर संबंधित व्यक्ती ाजकीय पुढार्यांच्या सल्ल्याने मंत्रालय . गाठून आपल्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील होते मात्र आत्ता १५ ऑगस्ट पासून. मंत्रालय प्रवेशासाठी( पास) राज्याच्या गृह विभागाने आता ऑनलाईन प्रणाली द्वारे चालू केल्याने सर्वसामान्यांना मंत्रालयीन प्रवेश दुरापास्त होणार आहे
राज्याच्या कानाकोपऱ्यातून आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मंत्रालयात येणाऱ्या अभ्यंगताना आता केवळ (डीजी )प्रवेश या ऑनलाइन ॲप आधारित प्रणाली द्वारे मंत्रालय प्रवेश पास घेऊन मंत्रालय प्रवेश मिळवता येणार आहे
मंत्रालयात प्रवेशासाठी१५. ऑगस्ट पासून ही नवीन कार्यप्रणाली लागू केली जाणार आहे अभ्यंगतांकडे मंत्रालय प्रवेश मिळवण्यासाठी आधार कार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड ,आदी शासन मान्य ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. मात्र राज्यातील गोरगरीब अशिक्षित व स्मार्टफोन नसलेल्या . अभ्यंगतांकरिता गार्डन गेट येथे ऑनलाईन ॲप आधारित प्रणालीद्वारे मंत्रालयात प्रवेश नोंदणी करता तसेच मदती करता एक खिडकी उपलब्ध असणार आहे त्यामुळे आता मंत्रालयात यायच असेल तर नागरिकांना डिजिटल व्हावे लागणार आहे याबाबतचा महाराष्ट्राच्या गृह विभागाने११. ऑगस्ट रोजी एक आदेश जारी केला आहे त्यानुसार यापूर्वी कार्यान्वित करण्यात आलेली मॅन्युअल प्रवेश पास देण्याची पद्धत बंद करण्यात आली आहे
डीजी ॲपच्या माध्यमातून नोंदणी…….
डिजिटल ॲप म्हणजे डीजी प्रवेश ॲप हे मोबाईल मधील अँड्रॉइड आणि आय ओ एस एप्पल स्टोअर वरdigi pravesh
हे सर्व केल्यास हे ॲप विनामूल्य डाऊनलोड करता येते या ॲपवर सुरुवातीला केवळ एकदाच नोंदणी करणे आवश्यक राहील नोंदणी झाल्यानंतर आधार क्रमांकावर आधारित यंत्रणेद्वारे छायाचित्राची ओळख पटवून नोंदणी पूर्ण केल्यानंतर ज्या विभागात काम आहे त्याचा स्लॉट बुक करून रांगे शिवाय प्रवेश घेता येईल या संपूर्ण प्रक्रियेत तीन मिनिटापेक्षा कमी कालावधी लागतो
ॲप वापरता न येणाऱ्यांना दरवाजे बंद?
राज्यातील महायुती सरकारने हे नवीन digi pravesh. ॲप वितरित करून या ॲप शिवाय मंत्रालयात आता सर्वसामान्यांना पाऊल टाकता येणार नाही अधिकारी असो कर्मचारी असो किंवा सामान्य भेट देणारा व्यक्ती असो आधी ऑनलाईन नोंदणी करा मगच प्रवेश यामुळे सर्वसामान्य जनतेला आता मोबाईल तो देखील अँड्रॉइड असल्याशिवाय मंत्रालयात प्रवेश मिळणार नसल्याने सर्व सामान्य जनतेला लोकशाहीत जनता आणि सरकार यांच्यातले दरवाजे बंद होणार आहेत यामुळे सर्वसामान्य जनतेत या नवीन मंत्रालयीन प्रवेशाच्या ॲपच्या निर्माण मुळे नाराजी व्यक्त होत आहे राज्यातील सर्वसामान्य जनतेला यापुढे मंत्रालयात प्रवेश करावयाचा असेल तर अँड्रॉइड मोबाईलच आवश्यक असल्याचे यातून स्पष्ट होत आहे