महाड (मिलिंद माने) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे राज्यातील महापालिका नगरपालिका जिल्हा परिषदच्या निवडणुका नवीन प्रभाग रचनानुसार आणि ओबीसी आरक्षणासह घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिला आहे त्यामुळे नवीन प्रभाग रचनेला आव्हान देणारे याचिका सर्वोच्च न्यायालयात फेटाळण्यात आली असून यामुळे रायगड जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ५९ वरून ६६ होणार आहे
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील वाढ किंवा प्रभाग रत्न हा पूर्णपणे राज्य सरकारचा अधिकार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले या बाबत दोन याचिका न्यायालयाने फेटाळले आहे त्यामुळे राज्य सरकारने आदेश दिल्यानुसार नवीन प्रभाग रचनेनुसार राज्यातील निवडणुका होणार आहेत
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या मे२०२१. हसून रखडल्या आहेत ओबीसी आरक्षणासंबंधी एक याचिका दाखल करण्यात आली होती त्यामुळे या निवडणुका रखडल्या होत्या त्यावर निर्णय देत या निवडणुका ओबीसी आरक्षणा नुसारच घेण्यात याव्या असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले त्यानुसार नवीन प्रभाग रचनेचे आदेश राज्य सरकारने दिले होते
मागील महिन्यात ६ मे २०२५ रोजी. या संबंधित निर्देश देऊन राज्य सरकारला निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते प्रभाग रचना करण्याचा अधिकार हा पूर्णपणे राज्य सरकारचा असल्याचे त्यावेळी न्यायालयाने सांगितले होते त्यानुसार राज्य सरकारने नवीन प्रभाग रचनेचे आदेश दिले होते परंतु लातूर मधील औसा नगरपालिके संबंधी एक हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली त्यामध्ये नवीन प्रभाग रचनेवर आक्षेप घेण्यात आला होता आता सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे
मागील दोन महिन्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला ओबीसी आरक्षणावरून काही निर्देश दिले होते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत चार आठवड्यात नोटिफिकेशन काढा आणि चार महिन्याच्या आत निवडणुका घ्या असे न्यायालयाने म्हटले होते१९९४. ते २०२२ पर्यंत जी. ओबीसी आरक्षणाची स्थिती होती त्यानुसारच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घ्या असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत
राज्य सरकारला आणि राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या कार्यकाळात कार्यवाही करावी अशी न्यायालयाने म्हटले होते सन २०२२ मध्ये. जी प्रभाग रचना झाली होती तो कायदा रद्द करण्यात आला तर २०१७ च्या पुनर्रचनेनुसार. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत
रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्य संख्येत वाढ होणार!
रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य संख्या ५९ होती ती आता ६६ वर जाणार आहे
रायगड जिल्ह्यात १५ तालुके . यामध्ये प्रत्येक तालुक्यात जिल्हा परिषद. व पंचायत समिती सदस्य संख्या सदस्य संख्या पुढील प्रमाणे असून
१) पनवेल, जिल्हा परिषद सदस्य संख्या ९ गट क्रमांक १ ते ९ पंचायत समिती सदस्य संख्या १८ गण क्रमांक १ते १८
२) कर्जत जिल्हा परिषद सदस्य संख्या ६ गट क्रमांक १० ते १४, पंचायत समिती सदस्य संख्या १२ गण क्रमांक १९ते ३०
,३)खालापूर जिल्हा परिषद सदस्य संख्या ५गट क्रमांक १५ते १९ पंचायत समिती सदस्य संख्या १०गण क्रमांक ३१ ते ४०
४) सुधागड, जिल्हा परिषद सदस्य संख्या २ गट क्रमांक २०ते २१ पंचायत समिती सदस्य संख्या ४ गण क्रमांक ४१ ते ४४
५)पेण जिल्हा परिषद सदस्य संख्या ६ गट क्रमांक २२ ते २८ पंचायत समिती सदस्य संख्या १२ गण क्रमांक ४५ते ५६
६),उरण जिल्हा परिषद सदस्य संख्या ५ गट क्रमांक २९ते ३३, पंचायत समिती सदस्य संख्या १० गण क्रमांक ५७ ते ६६
,७)अलिबाग, जिल्हा परिषद सदस्य संख्या ८ गट क्रमांक ३४ ते ४१, पंचायत समिती सदस्य संख्या १६गण क्रमांक ६७ ते ८२
८)मुरुड जिल्हा परिषद सदस्य संख्या २ गट क्रमांक ४२ ते ४३, पंचायत समिती सदस्य संख्या ४ गण क्रमांक ८३ ते ८६
९)रोहा जिल्हा परिषद सदस्य संख्या ५गट क्रमांक ४४ते ४८, पंचायत समिती सदस्य संख्या १० कण क्रमांक८७ ते ९६
, १०)तळा जिल्हा परिषद सदस्य संख्या २ गट क्रमांक ४९ते ५०, पंचायत समिती सदस्य संख्या ४ गण क्रमांक ९७ ते १००
११)माणगाव जिल्हा परिषद सदस्य संख्या ५गट क्रमांक ५१ ते ५५, पंचायत समिती सदस्य संख्या १० गण क्रमांक १०१ ते ११०
, १२)महस्ळा, जिल्हा परिषद सदस्य संख्या २ गट क्रमांक ५६ते ५७ पंचायत समिती सदस्य संख्या ४ गण क्रमांक १११ ते ११४
१३) श्रीवर्धन. जिल्हा परिषद सदस्य संख्या २ गट क्रमांक ५८ ते ५९, पंचायत समिती सदस्य संख्या ४ गण क्रमांक ११५ ते ११८
१४),महाड, जिल्हा परिषद सदस्य संख्या ५ गट क्रमांक ६०ते ६४ पंचायत समिती सदस्य संख्या १० गण क्रमांक ११९ते १२८
१५)पोलादपूर जिल्हा परिषद सदस्य संख्या २ गट क्रमांक ६५ ते ६६, समिती सदस्य संख्या ४ गण क्रमांक १२९ ते १३२