मुंबई — मुंबईतील उमरखाडीत शुक्रवार, संध्याकाळी यंग उमरखाडी क्रीडा मंडळाच्या वतीने नारळी पौर्णिमा आणि चोर गोविंदा सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला जाणार आहे. हा कार्यक्रम शिवसेना मुंबादेवी विधानसभा पुरस्कृत असून शिवसेना मुंबादेवी विधानसभा संघटक रुपेश पाटील व महिला उपविभाग प्रमुख प्रिय रूपेश पाटील यांच्या पुढाकाराने होत आहे.
कार्यक्रमात प्रसिद्ध लावणी नृतांगना गौतमी पाटील, तसेच बिग बॉस फेम दादूस, परमेश माळी, प्राप्ती रेडकर, सुशांत शेलार यांसारखे कलाकार उपस्थित राहणार आहेत. याशिवाय नामांकित कबड्डीपटू सुशांत देवाडिगा आणि विशाल माने यांचीही उपस्थिती लाभणार आहे.
नागरिकांसाठी खास आगरी-कोळी गीतांचा कार्यक्रम आणि महिलांसाठी आकर्षक चषक व रोख बक्षिसे देण्यात येणार आहे.असंख्य गोविंदा पथकांचा जोशपूर्ण सहभाग यामुळे उमरखाडी आज मराठमोळ्या संस्कृतीच्या महाउत्सवाने दणाणून जाणार आहे!