मुंबई (मिलिंद माने) राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील दौऱ्यात वेळेवर उपस्थित नसल्याबद्दल नांदेड जिल्ह्यातील किनवट हसीलदारांना नांदेड जिल्हा अधिकार्याने कारणे दाखवा नोटीस बजावल्याने महसूल प्रशासनात खळबळ माजली आहे
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ हे दोन जून रोजी नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील इस्लामपूर येथे दौऱ्यावर येणार असल्याबाबत तहसीलदार कार्यालयाला ई-मेल व व्हाट्सअप मेसेज द्वारे अवगत करण्यात आले होते तथापि मंत्री महोदयांच्या आगमना प्रसंगी रेल्वे स्टेशन/ शासकीय विश्रामगृह इस्लामपूर येथे राज्य शिष्टाचाराच्या अनुषंगाने उपस्थित राहून मान्यवरांचे स्वागत व इतर आवश्यक व्यवस्था परिपूर्ण असल्याबाबत खात्री करून प्रसंगी उपस्थित राहणे अनिवार्य होते
नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील तहसीलदार श्रीमती शारदा चोंडेकर यांची ही कृती महाराष्ट्र नागरिक सेवा( वर्तवणूक) नियम, १९७९ मधील नियमांचा स्पष्टपणे भंग करणारी आहे ही बाब गंभीर स्वरूपाचे असून ते शासकीय शिस्त आणि कर्तव्य परायण तेच्याविरुद्ध असल्याने मंत्री महोदयांच्या आगमना समई अनुप अनुपस्थिती बाबतचा लेखी खुलासा आपण ही नोटीस मिळाल्यापासून दोन दिवसाच्या आत सादर करावा आपला खुलासा समाधानकारक न आढळल्यास किंवा मुदतीत सादर न केल्यास आपल्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा( शिस्त व. अपील) नियम, १९७९ नुसार योग्य ती शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल अशा प्रकारची नोटीस नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी किनवटच्या तहसीलदार श्रीमती शारदा चोडेकर यांना बजावली आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या या नोटिशीमुळे राज्यातील सर्वच महसूल अधिकाऱ्यांमध्ये याबाबत खळबळ माजली आहे