मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहकार्याने विलेपार्ले (पूर्व) येथील नंददीप को-ऑप. हौसिंग सोसायटीच्या स्वयं पुनर्विकास प्रकल्पाचे उदघाटन भाजपा विधानपरिषद गटनेते व मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांच्या हस्ते पार पडले.
नंददीप सोसायटीने मुंबईकरांना दाखवून दिलेय आम्ही केले तुम्हीही करून दाखवा. नंददीप सोसायटीच्या माध्यमातून ‘आत्मनिर्भर’ बनण्याचा आदर्श पुढे आलाय.