Mumbai’s First Climate Budget: मुंबई ठरले हवामान बजेट सादर करणारे भारतामधील पहिले शहर; BMC कडून 10,224.24 कोटी रुपयांची तरतूद

Spread the love

मुंबईतील वातावरणीय बदलाच्या आव्हानांना सामोरे जाताना, प्रशासन प्रणाली बळकट करण्याच्या दिशेने या अहवालाच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या वतीने महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.

Mumbai’s First Climate Budget: जगभरातील हवामान तंत्रज्ञानाच्या गुंतवणुकीत वेगाने वाढ होत असताना, बीएमसीने 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 2024-25 साठीचा पहिला हवामान अंदाजपत्रक अहवाल सादर केला. यासह असा अहवाल प्रसिद्ध करणारी देशातील पहिली आणि जगातील चौथी महापालिका ठरली आहे. याआधी ओस्लो, न्यूयॉर्क आणि लंडन या शहरांनी असे अंदाजपत्रक सादर केले आहे. मुंबईतील हवामानाशी संबंधित उपक्रमांसाठी नागरी संस्थेने 10,224.24 कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणा करण्यात आली. हे 31,774.59 कोटी रुपये भांडवली खर्चाच्या जवळपास 32.18% आहे.

मुंबईतील वातावरणीय बदलाच्या आव्हानांना सामोरे जाताना, प्रशासन प्रणाली बळकट करण्याच्या दिशेने या अहवालाच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या वतीने महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. यातून धोरणात्मक कृतींची अंमलबजावणी करणे, संसाधनांचा योग्य प्रकारे वापर करणे, मुंबईत अधिकाधिक हरित क्षेत्र वाढ करणे आणि वातावरणस्नेही उपक्रम राबविणे शक्य होईल. हे हवामान अंदाजपत्रकासाठी जागतिक C40 कार्यक्रमाचा एक भाग आहे. C40 हवामान संकटाशी लढण्यावर आणि शहरी कृती चालविण्यावर लक्ष केंद्रित करते, ज्यामुळे हरितगृह वायू उत्सर्जन आणि हवामान धोके कमी होतात, तसेच शहरी रहिवाशांचे आरोग्य, कल्याण आणि आर्थिक संधी वाढतात. मुंबईच्या हवामान बजेटचा संपूर्ण अहवाल ‘या’ ठिकाणी पाहू शकाल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *