महाड (मिलिंद माने) महाड दापोली राज्य मार्गावर मे महिन्यापासून चालू झालेली अपघातांची मालिका ऑगस्ट महिना महिना आला तरी देखील चालू असून आज दुपारी दोनच्या सुमारास कारंजाडी बुद्धवाडी जवळील त्रिव्र उतारावर मुंबई मंडणगड एसटी बस रस्त्यावरून घसरली सुदैवाने जीवित हानी टळली असली तरी नेमका अपघात रस्त्याच्या गुळगुळीतपणामुळे की अन्य कशामुळे याबाबत मात्र शंका व्यक्त केली जात आहे
महाड दापोली राज्य मार्गावरील मे महिन्यापासून चालू झालेल्या अपघातांच्या मालिकेचे ऑगस्ट महिना महिना आला तरी . थांबण्याचे नाव अद्याप घेत नाहीत आज दुपारी मुंबई मंडणगड ही मंडणगड आगाराची एम एच .२०.BL. १७१५ ही बस . कन्नडी बुद्धवाडी येथील तीव्र उतारावर मागील वेळेस पुणे फौजी अंबवडे अहिरे कोंड या बसला ज्या ठिकाणी अपघात झाला होता त्याच ठिकाणी ही बस उतारा मध्ये पाऊस पडत असल्यामुळे व रस्ता निसरडा असल्याने रस्त्यावरून घसरून झालेल्या अपघातात बस रस्ता सोडून रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या साईट पट्टीवर जाऊन चिखलात रुतली सुदैवाने या अपघातात कोणी जखमी झाले नसले तरी रस्त्याच्या दर्जान्नतीबाबत पुन्हा एकदा प्रश्न उभा राहिला आहे
महाड दापोली राज्य मार्गावर अपघाताची मालिका पुन्हा एकदा रस्ता निसरडा झाल्यामुळे चालू झाली असून एसटी महामंडळाच्या बसेस अपघात झाल्यानंतर देखील मे महिन्यामध्ये निकृष्ट दर्जाचे डांबर वापरून रस्त्यावर शिलकोट मारून डांबरीकरण करण्याचा उद्योग करणाऱ्या एफएमसी कंट्रक्शन कंपनी विरोधात अद्यापी सार्वजनिक बांधकाम खाते का गुन्हा दाखल करीत नाही असा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा निर्माण झाला आहे
महाड दापोली राज्य मार्गावर आज झालेल्या एसटीच्या अपघातामुळे गणेशोत्सव काळात या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांची संख्या लक्षणीय असल्याने ऐन गणेशोत्सवात या मार्गावर होणाऱ्या अपघाताला जबाबदार कोण असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे