महाड (मिलिंद माने) कोकणातील रायगड जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ ला बसला असून. सुकेळी खिंड, नागोठणे. या ठिकाणच्या रस्त्यावर पाणीच पाणी आले असून पाण्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे पाहण्यास मिळते
कोकणातील रायगड जिल्ह्यात गुरुवारी पहाटेपासून चालू झालेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक६६. ला बसला असून या मार्गावरील कोलाड ,सुकेळी खिंड, नागोठणे येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साठले आहे या पाण्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे महामार्गावर साठलेल्या पाण्यामुळे रस्त्यात वाहने बंद पडण्याचे प्रकार देखील घडल्याचे चित्र महामार्गावर सकाळपासूनच दिसत आहे मात्र महामार्गावर पाणी का साठले याचे उत्तर राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अधिकारी देतील का असा सवाल वाहन चालक विचारत आहेत
महामार्ग खात्याची पोलीस गेले कुठे?
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महामार्ग सुरक्षा गस्त पथकाचे सुकळी खिंड तसेच नागोठण्या जवळील जिंदाल कंपनीजवळ वाहनांच्या तपासणीसाठी या महामार्गाच्या दोन्ही बाजूस उभे असतात मात्र याच महामार्गावर फाटलेल्या पाण्याबाबत मात्र वाहतुकीचे मार्गदर्शन करताना ते पाहण्यास मिळत नाहीत हे पोलीस गेले कुठे केवळ वाहन चालकांना त्रास देण्यासाठी यांच्या नेमणुका केल्या आहेत का? असा प्रश्न पाण्यातून मार्ग काढणारे असंख्यवान चालक या वेळेला सवाल करीत होते
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर साठलेल्या पाण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अधिकारी काम करणाऱ्या ठेकेदाराची यंत्रणा नेमकी गेली कुठे आज जर ही परिस्थिती आहे तर पुढील दोन महिन्यात पावसाळ्यात या महामार्गाचे काय अवस्था होईल याचीच कल्पना न केलेली एकंदरीत मुंबई व राष्ट्रीय महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार असा प्रश्न कोकणकरांना या निमित्ताने पडला असून यंदाच्या वर्षी गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी खड्ड्यातूनच प्रवास करण्याचे विघ्न कोकणातील जनतेला पहावे लागणार आहे कोकणातील लोकप्रतिनिधी मात्र अद्याप या महामार्गाच्या दुरावस्थेबाबत का गप्प आहेत असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे