महाड (मिलिंद माने) – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी लातूरमध्ये छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ महाडमध्ये छावा मराठा योद्धा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सुरज चव्हाण यांच्या फोटोला जोडो मारो आंदोलन करून निषेध व्यक्त केला
महाड मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भावा मराठा योद्धा संघटनेचे महाड तालुका अध्यक्ष मुदतशीर पटेल यांनी लातूरमध्ये घडलेल्या छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या महाराणीचा निषेध व्यक्त करीत सुरज चव्हाण यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करून सुरत चव्हाण यांचा निषेध व्यक्त केला
सुरज चव्हाण प्रकरणामुळे छावा संघटनेचा रोष उफाळून आला आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये भीतीचे व गोंधळाचे वातावरण पसरले असून रायगड जिल्ह्यात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच तालुक्यातील कार्यालया बाहेर पोलिसांचा बंदोबस्त असून येणाऱ्या जाणाऱ्यांची कसून चौकशी करीत येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकावर नजर ठेवण्याचे काम पोलिसांकडून केले जात आहे