मुंबई :मुंबा देवीतील मनपा प्रभाग क्रमांक २२० मधल्या महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या हाऊस गल्ल्या ,रस्ते , इमारती , चाळी , कचऱ्याचे ढीग , गोल देवळाचे सुशोभीकरणातला गैर कारभार, पालिकेचे बंद दवाखाने अशा एकना अनेक प्रकारच्या समस्या बाबत आणि नागरिकांनी केलेलेया तक्रारींचे निवारण अधिकाऱ्याकडून होत नसल्याने अखेर दि २६ जून रोजी मुंबा देवी विभागातल्या मनसे कार्यकर्त्यांनी एकत्रपणे सी विभाग कार्यालयात धडक देत गुरवारी सी विभागाचे मा.सहाय्यक आयुक्त यांचे दालनात नागरिकांच्या तक्रारींचा पाढा वाचून सहायक आयुक्तांना तक्रारींचे निवेदन सादर करण्यात आले असता
सदर वेळी मनसे मार्फत करण्यात आलेल्या मागण्यांची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात येईल असे आश्वासन सहाय्यक आयुक्त संजय इंगळे यांनी सर्वांना दिले. ह्या प्रसंगी मुंबा देवी विभाग अध्यक्ष प्रशांत गांधी, महिला विभाग अध्यक्ष सौ आरती पडवळ यांच्या नेतृत्वाखाली मनसे शिष्टमंडळ केशव मुळे( मनपा कर्मचारी सेना,उपाध्यक्ष), स्थानिक प्र.शाखा अध्यक्ष वैभव राऊत, महिला प्र.शाखा अध्यक्ष सौ. सारिका सणस, श्रीमती जयवंती म्हात्रे, रूपाली बिर्जे, राजेश बनसोडे, संदीप सणस व कार्यकर्ते उपस्थित होते.