मुंबई – नाशिक मधील उबाठाचे माजी नगरसेवक सचिन मराठे, प्रशांत दिवे, कमलेश बोडके तसेच उबाठा गटाचे उपजिल्हाप्रमुख कन्नु ताजणे यांनी गुरुवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गणेश गीते यांनीही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आ. राहुल ढिकले, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, ज्येष्ठ नेते बाळासाहेब सानप, लक्ष्मण सावजी, सुधाकर बडगुजर मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी यावेळी उपस्थित होते.