महाड (मिलिंद माने) महाड आगारात योग्य नियोजनाच्या अभावामुळे काँक्रीट करण्याच्या केलेल्या कामामुळे पूर्ण आगारात पाण्याचे तळे झाले असून. विभाग नियंत्रक पेण व आगार प्रमुख फुलपगारे यांच्या दुर्लक्षितपणामुळे आज लाखो प्रवाशांना जीव मुठीत घेऊन या आगारातून बसमध्ये प्रवास करावा लागत असल्याचे चित्र पाहण्यात मिळाले
महाड एसटी आगारात काँक्रीट करण्याचे काम ज्या ठेकेदारामार्फत करण्यात आले त्या कामाबाबत एसटी कर्मचाऱ्यांसहित प्रवासी वर्गाकडून सुरुवातीपासूनच अनियमित्ता असल्याने कामाचा दर्जा निकृष्ट दर्जाचा असल्याने आगार पावसाळ्यात पाण्यात जाणार याबाबत प्रवाशांकडून पूर्वकल्पना देऊन देखील या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने मे महिन्यातील अवकाळी पावसातच महाड एसटी आगार पाण्यात गेले.
कोकणातील मध्यवर्ती आगार म्हणून महाड आगाराकडे पाहिले जाते. मात्र अवकाळी पावसामुळे प्रवासी स्थानकात मोठ्या प्रमाणावर पाण्याचे साम्राज्य झाल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींना याला सामोरे जावे लागत होते एवढे असून देखील आगार प्रमुख फुल पगारे यांना विचारणा केली असता याबाबत त्यांनी केवळ हसण्यावारी नेले यावरून प्रवासी मोठ्या प्रमाणावर संत झाले असताना देखील एसटी महामंडळ याबाबत कोणतीही उपाययोजना करताना दिसत नाही एकंदरीत महाड एसटी आगाराचा कारभार आंधळ दळते कुत्र पीठ खात आहे असा आहे