अठराव्या वर्षी देखील वाहतूक कोंडी व खड्ड्यातूनच कोकणकरांचा गणेशोत्सव
दरवर्षीप्रमाणे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचा पाहणी दौरा
पेण पासून लोणेर पर्यंत रस्त्यावरील खड्ड्यांची मलमपट्टी पंधरा दिवसात कशी करणार प्रवाशांचा संतप्त सवाल!
महाड (मिलिंद माने) तब्बल २०दिवसांवर कोकणातील गणेशोत्सव. येऊन ठेपला असताना देखील रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांचे विघ्न संपण्याचे नाव घेत नसून खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी अवस्था या महामार्गाची झाली असून रायगड जिल्ह्यात निवडून येणारे सर्वच आमदार व खासदार सत्ताधारी राज्य व केंद्र सरकारमधील प्रतिनिधित्व करीत असताना यंदा देखील चाकरमान्यांना वाहतूक कोंडी व खड्ड्यातूनच रायगड जिल्ह्यातील टप्पा पार पाडावा लागणार . असून केवळ खड्ड्याची मलमपट्टी कशी करायची यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले सात ऑगस्ट रोजी पाहणी दौरा करणार असले तरी मंत्र्यांचा पाहणे दौरा हा केवळ फार्स ठरू नये अशी कोकणकर अपेक्षा व्यक्त करीत आहेत
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ च्या कामाला तब्बल १८ वर्ष. झाली मात्र तरी देखील या महामार्गाचे काम अद्याप पूर्ण होण्याचे नाव घेत नाही रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गाची अवस्था रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी झाली आहे पेण ते नागोठणे या पट्ट्यात अनेक ठिकाणी रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असून मागील १७ वर्ष या कोकणातील जनतेला. या महामार्गावरून खड्ड्यातूनच प्रवास करावा लागला आहे तशीच अवस्था अठराव्या वर्षी देखील कोकणातील जनतेवर येऊ नये यासाठी १५ ऑगस्ट पूर्वी या महामार्गावरील पडलेले खड्डे सुस्थितीत करून रस्ता. पूर्ववत करा तसेच या महामार्गावरून जाणारे रायगड जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षातील सर्वच लोकप्रतिनिधी सरकार दरबारी आवाज उठवण्यात अपयशी ठरले आहेत का असा सवाल उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हा वाहतूक सेनेचे अध्यक्ष सुभाष मोरे यांनी केला . होता यानंतर राज्य सरकारला जाग आली असून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र शहराजे भोसले हे ७ ऑगस्ट रोजी पनवेल जवळील पळस्पे फाटा येथून सकाळी दहा वाजल्यापासून या पाहणी दौऱ्याला सुरुवात करणार आहेत त्यानंतर ते महाड येथे दुपारी १.३० वाजता त्यांनी महाड येथील शासकीय विश्रामगृहात संबंधित यंत्रणेचे प्रतिनिधी संबंधित विभाग प्रमुख कंत्राटदार तसेच शासकीय अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे
महामार्गावर अठरा वर्षात अपघातात ज्यांचे बळी गेले आहेत व जे अपघात ग्रस्त कायमस्वरूपी जायबंदी झाली आहेत त्या कुटुंबांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कोकणातील जनता मागील १७ वर्षापासून करीत आहे . मात्र याकडे राज्य सरकार व केंद्र सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप कोकणातील जनतेकडून वारंवार केला जात आहे
ज्या काळात छगन भुजबळ यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना नाशिकला जोडणारे सर्व महामार्ग व रस्ते सुस्थितीत केले त्याच काळात औरंगाबाद, सोलापूर ,पुण्याला रोडणारे रस्ते देखील उच्च प्रतीचे झाले. त्याच पद्धतीने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ते देखील विद्यमान खासदार व तत्कालीन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उत्तम प्रतीचे करून घेतले मात्र अपवाद राहिला तो रायगड जिल्हा व रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पूर्णत्वाबाबत ना सरकारशी कधी भांडण्याचा प्रयत्न केला अथवा जाब विचारला ना जनतेबरोबर रस्त्यावर उतरताना कोकणातील लोकप्रतिनिधी दिसले नाहीत
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पूर्णत्वासाठी मागील वर्षी जनआक्रोश समितीने ६ दिवस. रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे उपोषण केले मात्र त्यावेळेला तत्कालीन रायगड वर रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी उपोषण स्थळी चर्चेला न येता हवाई मार्गाने पलायन केल्याचे रायगड रत्नागिरी जिल्ह्यातील लोकांनी पाहिले आहे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी महाडचे आमदार गोगावले यांनी भ्रमणध्वनीद्वारे( व्हिडिओ कॉल द्वारे) सात मिनिटे चर्चा करून या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले मात्र मुख्यमंत्रीपद गेले व आश्वासन हवेत विरले अशी म्हणण्याची वेळ आता कोकणकर जनतेवर आली आहे
कोकणातील गणेशोत्सव जवळ आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पळस्पे फाटा येथून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांची पाहणी करण्यास सुरुवात केली व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून खड्डे भरण्यास सांगितले
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांबाबत
पहिली टेक्नॉलॉजी. एम. ६० आर एफ सी. आणि लिओपोलिमर पद्धत
दुसरी रॅपिडेक्स हार्डनर एम. ६०पद्धत आणि तिसरी डी एल सी पद्धत या तीन आधुनिक पद्धतीने या महामार्गावरील खड्डे भरण्याचे काम चालू केले
त्याचप्रमाणे चौथी पद्धत ब्रिक्स कास्ट एम ६० ही पद्धत, या पद्धतीमध्ये सिमेंटच्या तयार प्लेट्स बसवून रस्ता तयार करण्यात आला
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी यांच्या समन्वयेने मागील वर्षी खड्डे भरण्याचे काम हाती घेतले त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मी मुख्यमंत्री असलो तरी एक सामान्य कार्यकर्ता आहे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना जो काही त्रास होतोय तो त्रास होऊ नये यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले तसेच जुने कंत्राटदार काम सोडून पळाले आहे त्यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश त्यांनी तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना दिले मात्र या सर्वांचे पुढे काय झाले हे मात्र अध्यापि गुलदस्त्यात आहे कारण जर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी या रस्त्याची पाहणी करून खड्डे भरण्याचे काम आधुनिक तंत्रज्ञान पद्धतीने केले होते व संबंधित कंत्राटदारांवर मनुष्यवराचा गुन्हा दाखल करा सांगितले होते याचे पुढे काय झाले याबाबत ना रायगड जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींनी ना रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींनी राज्याच्या विधानसभेत आवाज उठवला ना केंद्राच्या संसदीय अधिवेशनात यामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत कोकणात निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींना किती आस्था आहे हे यावरून सिद्ध होत आहे
कोकणातील गणेशोत्सव सण चालू होण्यास केवळ २० दिवसांचा अवधी शिल्लक आहे. २७ ऑगस्ट रोजी गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. मात्र आठ दिवस अगोदरच कोकणात राहणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पाहण्यास मिळते मागील वर्षी ज्या ठिकाणी खड्डे पडले होते त्याच ठिकाणी यावर्षी देखील खड्डे पडले आहेत
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव, इंदापूर, लोणेरे व कोलाड तसेच नागोठणे या ठिकाणी. पडलेले जीवघेणे खड्डे व रस्त्याची अर्धवट अवस्थेत असलेली कामे यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होणार आहे माणगाव व इंदापूर या दोन गावांमधून जाणारा रस्ता हा अरुंद असल्याने वाहतूक कोंडीचा सामना नित्य नियमाने स्थानिक जनतेला भेडसावत आहे तसाच गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना यंदा देखील जाणवणार आहे
अमर्याद वाहनांची संख्या व अपुरा रस्ता
महाराष्ट्र राज्य मार्ग एसटी महामंडळाने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी तब्बल ५,०००एसटीच्या बसेस. सोडण्याचा निर्णय घेतला आहे त्याच पद्धतीने खाजगी बसेसची संख्या देखील ३ हजाराच्या वर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेवढ्यात पद्धतीने खाजगी वाहने यामध्ये कार व तीन आसनी रिक्षा बाईक स्वार यांची संख्या देखील लक्षणीय असणार आहे या सर्वांना वाहतूक कोंडीचा सामना करण्यासाठी जरी पोलीस प्रशासन सज्ज असले तरी दरवर्षी तुम्हाला या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असताना आजपर्यंत अठरा वर्षात यातून मार्ग का काढता आला नाही अशा. सवाल कोकणकर जनता या कोकणातील लोकप्रतिनिधींना विचारत आहे
रायगड जिल्ह्यात विधानसभेतील ७ आमदार व विधान परिषदेचे ३ आमदार व लोकसभेचे २ खासदार. तर राज्यसभेचे एक खासदार हे सर्व सत्ताधारी पक्षातील असताना यातील कोणत्याही लोकप्रतिनिधीने ना विधानसभेत आवाज उठविला ना लोकसभेत हा प्रश्न मार्गी लावला
जर समृद्धी महामार्ग हा पाच वर्षात पूर्ण होऊ शकतो तर कोकणातील महामार्ग पूर्ण होण्यास अठरा वर्षाचा कालावधी का लागतो? याचा अर्थ विदर्भातील नेत्यांची ताकद जास्त आहे व कोकण आणि रायगडच्या नेत्यांची ताकद केवळ राजकीय स्वार्थासाठी एकमेकांच्या तंगड्या खेचण्यातच आहे
मुंबई व महामार्गाचे काम अध्यापि पूर्ण झालेले नाही अनेक ठिकाणी अपूर्ण अवस्थेत पूल आहेत धोकादायक वळणे तशीच ठेवली आहे तर अनेक ठिकाणी महामार्गाचे काम चालू असल्यामुळे ज्या पद्धतीने बाह्य वळण रस्ते दिले आहेत त्यावरती पडलेले खड्डे जीवघेणे असून या खड्ड्यातूनच महामार्गावर धावणाऱ्या रुग्णवाहिकांना देखील दररोज सामना करावा लागत आहे
काम पूर्ण होण्या अगोदरच टोल नाके सज्ज टोल वसुली आधी पोलिसांची वसुली चालू
मुंबई व राष्ट्रीय महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील सुकेळी खिंड व पोलादपूर जवळील चांढेवे टोल नाका तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड चिपळूण मधील लोटे येथील टोलनाके बांधून तयार आहेत रायगड जिल्ह्यातील कासू ते इंदापूर. या४२.३ किलोमीटरच्या टोल वसुलीसाठी प्रवाशांना सुकळी खिंडीत वाटण्याची जोरदार तयारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून चालू झालेली आहे केवळ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची अधिसूचना निघणे बाकी आहे आणि ती देखील लवकरात निघण्याची शक्यता . खाजगी मध्ये राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील नागोठणे ते कोलाड नाका येथील प्रमुख उड्डाणपुलाची अद्यापि ४० टक्के कामे अर्धवट अवस्थेत आहेत तर काही ठिकाणी यामुळे एकेरी वाहतूक आहे अनेक ठिकाणी रस्ता चिखलमय झाला असून या चिखलातूनच अनेकांना आपली वाहने तारेवरची कसरत करून चालवावी लागत आहे न्यायालयाच्या आदेशाने पहिल्या टप्प्याचे काम डिसेंबर अखेर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे परंतु सध्या महामार्गावर चालू असलेल्या कामांचा वेग पाहता ही डेडलाईन पुन्हा पुढे ढकलण्याची शक्यता नाकारता येत नाही असे असले तरी तोंड वसुलीची डेडलाईन मात्र चुकणार नाही यासाठी ठेकेदाराकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न चालू आहेत सुकळी खिंड येथील टोल नाक्याचे काम पूर्ण झाले असले तरी कायदेशीरपणे टोल वसुली जरी चालू झाले नसली तरी लावलेले बॅरिकेट व त्या ठिकाणी महामार्ग सुरक्षा ग्स्त पथकाचे पोलीस यांची मात्र वाहन तपासणीच्या नावाखाली राजरोसपणे कोणती टोल आकारणी घेतात असा प्रश्न कोकणकर जनतेला पडला आहे मात्र या महामार्गावरून प्रवास करणारे लोकप्रतिनिधी हे क***** काकांच्या गाडीतून जात असल्याने त्यांना या पोलिसांकडून चाललेल्या अवैध्य वसुलीबाबत दिसत नसल्याचे अनेक वाहतूकदारांनी याबाबत सांगितले
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ च्या. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची पाहणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी आयोजित केलेला दौरा व रस्त्यावर पडलेले जीवघेणे खड्डे व त्यावरून जाणारी अवजड वाहने यामुळे राष्ट्रीय महामार्गावर खड्डे भरण्याबाबत करण्यात येत असलेली मलमपट्टी ही केवळ शोभेची ठरत असल्याचे आजपर्यंतच्या खड्डे भरण्याच्या पद्धतीवरून पाहण्यास मिळत आहे लोणेरे येथील सर्विस रोडवर पेवर ब्लॉक पद्धतीने रस्ता तयार करण्यात येत आहे मात्र या पेवर ब्लॉक करून जाणारी अवजड वाहने ही क्षमतेपेक्षा जास्त म** भरून जात असल्याने पेवर ब्लॉक खचून पुन्हा त्या जागी पूर्ववत खड्डा तयार होत असल्याने गणपतीपूर्वी केलेले रस्ते ऐन गणेशोत्सव काळात किती तग धरू शकतात असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे