सामाजिक स्थैर्यासाठीचे पत्रकारांचे मोठे योगदान – प्रकाश गायकवाड (पोलीस उपायुक्त)
मिरा रोड – राजकी ,सामाजिक क्षेत्रासह सर्व क्षेत्रातील अनेक दिग्गज पत्रकारितेतून निर्माण झाले असल्याची उदाहरणे आहेत त्यामुळेच या क्षेत्राला अनन्य साधारण महत्त्व आहे, २४ तास ३६५ दिवस काम करणारे पत्रकार यांचे सामाजिक स्थैर्यासाठीचे मोठे योगदान आहे असे भावपूर्ण विचार मीरा भाईंदर, वसई विरार पोलिस आयुक्तालयाचे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी पत्रकार दिनानिमित्त आयोजित केलेल्या मीरा रोड येथील कार्यक्रमात व्यक्त केले.
मीरा रोड येथे जर्नलिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रच्या मीरा भाईंदर युनिटने आयोजित केलेल्या पत्रकार दिन कार्यक्रमात बोलताना गायकवाड पुढे म्हणाले, जवाहरलाल नेहरू, लोकमान्य टिळक, बाबासाहेब आंबेडकर अशी अनेक दिग्गज राजकारणी पत्रकारितेतून निर्माण झाले होते. आजही सामाजिक, राजकारणी तसेच पोलिस यांना सुध्दा पत्रकारांचा मोलाचा सल्ला उपयोगी पडतो. गेल्या वर्षी मीरा रोड येथील दंगल परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पत्रकारांचे मोठे योगदान लाभले होते. जर्नलिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रच्या मीरा भाईंदर युनिटचे अध्यक्ष निलेश फापाळे यांच्या मार्गदर्शना खाली आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपायुक्त प्रकाश गायकवाड, सायबर सेलचे निरीक्षक सुजितकुमार गुंजकर,अंमली पदार्थ विरोधी विभागाचे निरीक्षक अमर मराठे यांचा उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सत्कार करण्यात आला तसेच सामाजिक क्षेत्रात आणि पत्रकारितेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विजय देसाई, वैभव घाग, राजा मयाल, वासिफ खान या पत्रकारांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.आपला रुपेश पाटील फाउंडेशन मार्फत सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या रुपेश पाटील व समाजसेवक महेंद्र सातपुते यांनाही सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले तसेच उपस्थित पत्रकारांना सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमाला संस्थेचे सरचिटणीस हेमंत सावंत, प्रदेश सचिव नामदेव काशिद,कोषाध्यक्ष दिलीप पटेल, मिरा भाईंदर युनिटचे अध्यक्ष निलेश फापले,सचिव प्रमोद देठे, सतीश साटम यांच्यासह सर्व कार्यकारणी सदस्यांचे मोठे योगदान होते.कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.