मुंबई – सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या बेलदरे गावातील राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत तयार केलेल्या ‘आपलं गाव’ या कृषी पर्यटन केंद्राची भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच यावेळी आ. दरेकरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.
आमदार प्रविण दरेकर हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. तेथून परतत असताना त्यांनी बेलदरे गावी ‘आपलं गाव’ या कृषी केंद्राला भेट देण्याचे ठरविले. मुंबई बँकेचे संचालक नंदकुमार काटकर यांचे बेलदरे हे गाव. यावेळी दरेकर यांचा बेलदरे गावातील ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला. दरेकर यांनी या भेटीत ‘आपलं गाव’ कृषी पर्यटन केंद्राची पाहणी केली. तसेच गोशाळा, गांडूळ खत, रोपवाटिका आणि आंब्याच्या बागांची पाहणी करत माहिती जाणून घेतली.