मुंबई, दि. 25: “भारताची अर्थव्यवस्था चार ट्रिलियन डॉलर्सच्या टप्प्यावर पोहोचली असून, आपला देश आज जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थशक्ती बनली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे कुशल नेतृत्व आणि त्यांनी घेतलेल्या कठोर निर्णयामुळे ही झेप भारताने घेतली आहे. आजचा दिवस भारतीयांसाठी अभिमानाचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे त्रिवार अभिनंदन,” अशी प्रतिक्रिया राज्याचे विधानपरिषद गटनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.
नीती आयोगाच्या बैठकीनंतर भारताच्या आर्थिक स्थितीबाबत नीती आयोगाचे सीईओ बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताने जपानला मागे टाकून चौथा क्रमांक पटकावला आहे. आता आपल्यापुढे केवळ अमेरिका, चीन आणि जर्मनी आहेत. ही केवळ आकड्यांची झेप नाही, तर सक्षम धोरणांची, दूरदृष्टीच्या नेतृत्वाची आणि ठोस अंमलबजावणीची प्रचिती आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र देखील देशाच्या विकासात आघाडी घेत राहील, याबद्दल शंका नसून भारताच्या प्रगतीमध्ये सर्वसामान्य जनतेची मेहनत आणि त्यांनी विश्वासाने निवडलेल्या आदरणीय मोदींच्या नेतृत्वातील सरकारला आहे, यापुढेही भारत अशीच प्रगती करत राहील, असा विश्वासही दरेकर यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारच्या निर्णयक्षम, परिणामकारक नेतृत्वाला जाते.