महाड नगर परिषदेच्या निवडणुकीत मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्यातील हाणामारी प्रकरणात
मंत्री पुत्र गोगावले समर्थकांसह ८ जण. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ५ जण महाड पोलिसांसमोर शरण !
महाड (प्रतिनिधी) स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील २ डिसेंबर रोजी मतदानाच्या दिवशी महाड नगर परिषदेच्या हद्दीत शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या समर्थकांमधील झालेल्या मारहाणी प्रकरणात राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले व त्यांच्या समर्थकांसह दहा ते बारा जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे महाड तालुका पोलीस ठाण्यात मध्यरात्री १ सुमारास. दाखल झाले होते अखेर मुंबई उच्च न्यायालयाने २३ जानेवारी रोजी सकाळ ११ वाजेपर्यंत पोलिसांसमोर शरण येण्याचे आदेश दिले होते.

मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश शिरसंवाद मानून मंत्री पुत्र विकास गोगावले सह . त्यांचे पुतणे महेश गोगावले ,. मंत्रिमंडळाचे भाचे विजय मालुसरे ,. प्रशांत शेलार, धनंजय मालुसरे ,वैभव मालुसरे, सुरज मालुसरे ,व सिद्धेश शेठ जण महाड शहर पोलीस ठाण्यात न्यायालयाच्या दिलेल्या वेळेच्या आधीच हजर झाले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे महाड तालुका अध्यक्ष निलेश महाडिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस हनुमंत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते धनंजय देशमुख, जगदीश पवार, व स्वर्गीय माणिकराव जगताप यांचे सुपुत्र श्रेयश जगताप यांनी ड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात हजर झाल्यावर त्यांना महाड ग्रामीण रुग्णालयात आणून वैद्यकीय तपासणी करून या सर्वांना महाड न्यायालयात हजर करण्यात आले मात्र या प्रकरणात अजून राष्ट्रवादी काँग्रेसचे चार व्यक्ती अजून हजर होणे बाकी असल्याने याबाबत न्यायालय काय निर्णय देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महाड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी शिवसेना शिंदे गट समर्थक राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले व त्यांचे आठ ते दहा समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेश उपाध्यक्ष सुशांत गणेश जाबरे यांच्यावर केलेल्या हल्ल्यासंदर्भात महाड तालुका पोलीस ठाण्यात काल मध्यरात्री १ च्या सुमारास. गुन्हा दाखल झाला होता
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश युवा उपाध्यक्ष सुशांत गणेश जाबरे यांनी महाड तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेश उपाध्यक्ष असल्याने पक्ष संघटनेचे काम करीत असताना महाड तालुक्यातील महाड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा आढावा व उमेदवारांच्या भेटी घेण्याकरता २ डिसेंबर रोजी सकाळी ११ च्या सुमारास. महाड शहरामध्ये फिरत असताना साधारणतः १२ वाजता प्रभाग क्रमांक ५ च्या उमेदवारांना भेटून. पायी येत असताना मंत्री पुत्र विकास गोगावले, प्रशांत कदम, विकी शिंदे, अन्य १७ते १८ इसम मोटरसायकलवर माझ्यासमोर आले. व एक महिन्यात तुझा कार्यक्रम करणार असे धमकी देऊन पुढे गेले व त्यानंतर मी तेथून प्रभाग १ व २ च्या मतदान केंद्राच्या बाहेर. अप्सरा हॉटेलच्या बाजूच्या रस्त्यावरील शोभाताई सावंत यांचे घरासमोर रस्त्यावर साधारण दुपारी १ च्या सुमारास. मी वापरत असलेली चार चाकी वाहन फॉर्च्यूनर गाडी क्रमांकMH.०२.FX.४१०० या गाडीमध्ये बसून जात असताना माझ्या गाडी समोर विकास भरत गोगावले ,महेश गोगावले, विजय मालुसरे, प्रशांत शेलार ,धनंजय मालुसरे, सिद्धेश शेठ, वैभव मालुसरे, सुरज मालुसरे व अन्य आठ ते दहा गुंड इसमांनी माझी गाडी अडवून मला शिवीगाळ करून गाडीच्या बाहेर यायला सांगत होते
मी गाडी बाहेर येत नाही हे पाहून सदर सर्व इसमानी माझ्यासोबत च्या गाडीच्या काचा फोडल्या माझा ड्रायव्हर पप्पू या गाडीच्या बाहेर खेचून काढून मारहाण करत होते विकास गोगावले यांनी मला गाडीच्या बाहेर खेचून माझे डाव्या कानाखाली मारली व मला मारहाण करण्यास सुरुवात केली त्यामध्ये माझा शर्ट पूर्णपणे फाटला त्याचबरोबर माझ्या गाडीतील माझा एक गार्ड गोपाल सिंग याला देखील त्यांनी बेदम मारहाण केली त्यामध्ये त्याचे डाव्या डोळ्यावर गंभीर दुखापत झाली होती
राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनी गार्ड गोपाल सिंग यांच्या कमरेवर असलेली परवाना रिवाल्वर खेचून घेतली व माझे वर तसेच गोपाल सिंग वर ताणून “आज तुमचा गेम करतो” असे बोलला त्यावेळी तेथील श्री राजू कोरपे हे मध्ये आले व त्यांनी मला तेथून वाचून बाजूला केले. मी माझा जीव वाचवण्याकरता तेथून पळालो सदर इसमानी माझ्यासोबत असलेले मित्र व्यंकट मंडाला ,मंजूसिंग अरोरा यांना देखील सदर इसमानी मारहाण केली असल्याचे दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले होते तसेच
सदर इसमानी माझ्यासोबत असलेले मित्र व्यंकट मंडला याची गळ्यातील सोन्याची चैन तीन मोबाईल ,गार्ड गोपाल सिंग याचा एक मोबाईल असे एकूण चार मोबाईल फोन सदर इसमाने काढून घेऊन ल
लंपास केले आहेत तसेच व्यंकट मंडला, गोपाल सिंग, मंजुत सिंग अरोरा यांना गंभीर दुखापती झाल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालय महाडमध्ये उपचाराकरता दाखल होते
राष्ट्रवादी प्रदेश काँग्रेसचे युवक उपाध्यक्ष सुशांत जाबरे यांनी महाड तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीमध्ये असे म्हटले आहे की सदर इसमांचा मला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न होता यापूर्वी देखील विकास गोगावले यांनी मला अनेक वेळा फोन वरून ठार मारण्याच्या धमक्या दिलेल्या आहेत सदर इस्मान पासून माझ्या जीवाला धोका आहे तरी माझी सदर झाल्या प्रकाराबाबत विकास भरत गोगावले ,महेश गोगावले, विजय मालुसरे, प्रशांत शेलार, धनंजय मालुसरे वैभव (बाबू )मालुसरे सुरज मालुसरे. सर्व राहणार . ढालकाटी तालुका महाड, सिद्धेश शेठ राहणार पोलादपूर तालुका पोलादपूर व अन्य आठ ते दहा गुंड इसम यांच्याविरुद्ध कायदेशीर तक्रार देत असल्याचे दाखल केलेल्या तक्रारीत स्पष्टपणे म्हटले होते
राष्ट्रवादी काँग्रेस सुशांत गणेश जाबरे यांनी महाड तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार शस्त्र अधिनियम १९५९,२५(१) (b), शस्त्र अधिनियम, १९५९,३, लोक प्रतिनिधित्व अधिनियम, १९५०,१९५१,१९८९
१३१,(२), महाराष्ट्र पोलीस अधिनियम१९५१, १३५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम१९५१, ३७(३), भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३,१०९(१), भारतीय न्याय संहिता (बी एन एस) २०२३,११५(२), भारतीय न्याय संहिता( बी एन एस) २०२३,११९(१), भारतीय न्याय संहिता (बी एन एस), २०२३,१२६(२), भारतीय न्याय संहिता (बी एन एस), २०२३,१८९(२), भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३,१९०, भारतीय न्याय संहिता (बी एन एस), २०२३,२९२, भारतीय न्याय संहिता (बी एन एस), २०२३,३२४(२), भारतीय न्याय संहिता (बी एन एस), ३२४(४), भारतीय न्याय संहिता (बी एन एस), २०२३,३२४(५), भारतीय न्याय संहिता (बी एन एस), २०२३,३२४(६), भारतीय न्याय संहिता ( बी एन एस), २०२३,३५१(२), भारतीय न्याय संहिता( बी एन एस) २०२३,३५१(३),
भारतीय न्याय संहिता (बी एन एस) ३५२, भारतीय न्याय संहिता (बी एन एस) ६१ वरील प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत
महाड तालुका पोलीस ठाण्यात महाड नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या मारहाणी प्रकरणात महाड तालुका पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार महाड तालुका पोलीस ठाण्याकडून हा गुन्हा महाड शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग . करण्यात आला होता
महाड मधील या प्रकरणानंतर शिवसेना शिंदे गटाचे राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्यासह त्यांचे पुतणे महेश गोगावले, भाचे विजय मालुसरे, प्रशांत शेलार ,धनंजय मालुसरे ,वैभव मालुसरे, सुरज मालुसरे व सिद्धेश शेठ यांनी अखेर मुंबई उच्च न्यायालयाने २३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत. पोलिसांना शरण येण्याचे आदेश दिले होते त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश शिरसंवाद मानून मंत्री भरत गोगावले यांनी त्यांचे पुत्र विकास गोगावले यांच्यासह आठ जणांना पोलिसांना आत्मसमर्पण करण्यास सांगितल्याने अखेर सकाळी दहाच्या सुमारास महाड शहर पोलीस ठाण्यात हे सर्व आरोपी हजर झाले ते हजर झाल्यानंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी महाड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना महाड शहर पोलीस ठाण्यात आणून दुपारी महाड न्यायालयात हजर उच् न्यायालयात या प्रकरणी त्यांना