मुंबई : वडिलांच्या आठवणीत दोन सख्ख्या भावांनी बांधलेल्या गिरगावातील एका मंदिराला नुकतीच १५० वर्ष पूर्ण झाली आहेत त्या निमित्ताने आमदार प्रवीण दरेकर यांनी मंदिराला अचानक भेट देऊन सर्वांनाच आश्चर्यचकीत केले आहे. दरेकर गिरगावात आल्याने पोलिसांची ही तारांबळ उडाली होती.
काही दिवसांपूर्वी याच मंदिराला भारताचे गृहमंत्री व भारतीय जनता पार्टीचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी भेट देऊन लक्ष्मीनारायणचे दर्शन घेतले होते.
श्रीमंतांच्या घरी जन्माला येणाऱ्या आणि आपल्या वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळणाऱ्या दोन सख्या भावांनी वडिलांच्या मृत्यू पश्चात कपोल समाजातील नरुत्तमदास आणि वर्जीवंदास ह्या भावांनी दिड लाख रुपये चलन खर्चून गिरगावातील सी पी टॅंक परिसरात मोठ्या भूखंडावर लक्ष्मीनारायणाचे मंदिर बांधले होते. वडील माधवदास रणछोडदास यांच्या नावावरून परिसराला माधवबाग सकुल असे नाव देण्यात आले
त्याशिवाय भक्तांसाठी धर्म शाळेची स्थापना करण्यात आली.
लक्ष्मीनारायणाच्या मंदिरा व्यतिरिक्त आणखीन सात देवी देवतांची मंदिरे माधवबागेत आहेत. मंदिराच्या बांधकामासाठी पोरबंदर दगडांचा वापर करण्यात आला होता. वास्तुविशारद भीमा रामजी यांच्या देखरेखीखाली बांधकाम करण्यात आले होते. मे महिन्यात दीडशे वर्षे पूर्ण झाल्या निमित्त मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करून आंब्याने सजावट करण्यात आली होती . त्यामुळे मंदिराची शोभा अधिकच द्विगुणित झाली होती.
१८९३ साली मुंबईत हिंदू मुस्लिम दंगली घडल्या होत्या अक्षरशः सैन्य तैनत करण्याची पाळी आली होती त्या वेळीच्या महापालिका आयुक्तांनी वर्जीवंदास यांना ब्रिटिश सरकारला मदत करण्याचे विनंती केली असता वर्जीवंदास यांनी टाऊन हॉलमध्ये हिंदू मुस्लिम नेत्यांच्या बैठकीलावून शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर हे प्रकरण मिटले होते.