मुंबई जिल्हा बँकेच्यावतीने स्वयंपुनर्विकासावर मार्गदर्शन शिबीर; आ. प्रविण दरेकरांच्या हस्ते होणार उदघाटन

मुंबई, दि. २१ जून : जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी खासगी विकासकांवर अवलंबून न राहता सोसायट्यांनी स्वयंपुनर्विकास मार्गाचा अवलंब करावा, यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि मुंबई सहकारी बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने एक विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार, दिनांक २२ जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता ग्रॅण्ट रोड येथील बालक वृंद एज्युकेशन सोसायटी, सुदत्ता हायस्कुल येथे पार पडणार आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपा गटनेते व मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे असतील. यावेळी मुंबई बँकेचे ज्येष्ठ संचालक शिवाजीराव नलावडे आणि मुंबई सहकारी बोर्डाचे अध्यक्ष अनिल गजरे यांचीही विशेष उपस्थिती लाभणार आहे.

 

शिबिरात सहभागी होणाऱ्या सोसायट्यांना स्वयंपुनर्विकास प्रक्रियेची सखोल माहिती देण्यात येणार असून, हर्षद मोरे हे स्वयंपुनर्विकास प्रक्रिया आणि अंमलबजावणी या विषयावर मार्गदर्शन करतील. तसेच उदय दळवी हे स्वयंपुनर्विकास कर्ज धोरण यावर माहिती देतील. याशिवाय घनश्याम सोमपुरा हे नंदादीप हौसिंग सोसायटीचा यशस्वी अनुभव उपस्थितांसमोर मांडतील.

 

या शिबिराद्वारे सहकारी गृहनिर्माण संस्थांना कायदेशीर, तांत्रिक आणि आर्थिक बाबींची अचूक व सविस्तर माहिती मिळणार असून, हा उपक्रम स्वयंपुनर्विकासाची दिशा शोधणाऱ्या सोसायट्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *