भाईंदर येथे शुक्रवारी मोफत मोतीबिंदू ऑपरेशन व मधुमेह तपासणी शिबीर

भाईंदर :- पंजाब केसरी आचार्य विजय वल्लभ सूरीश्वरजी समुदायचे गच्छाधिपती आचार्य श्री विजय नित्यानंद सुरीश्वरजी म.सा.व गच्छाधिपती आचार्य श्री कुलचंद्र सुरीश्वरजी (केसी)म.सा.

यांच्या आशीर्वादाने, युथ सोशल वेल्फेअर असोसिएशन (युथ फोरम) या सामाजिक- सांस्कृतिक संस्थेने सोहनबेन एम बंबोरी यांच्या स्मरणार्थ दृष्टी ‘व्हिजन फॉर ऑल’ अंतर्गत शुक्रवार, 6 जून रोजी भाईंदर येथे मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन केले आहे. भाईंदर-पश्चिम येथील खाऊ गल्ली समोर संगीता कॉम्प्लेक्स येथे सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत होणाऱ्या या शिबिरात डॉक्टरांच्या सल्ल्याने डोळ्यांची तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. याशिवाय मधुमेह तपासणी, इसीजी, बीएमइ,दंत, रक्तदाब तपासणीही करण्यात येणार आहे. शिबिरात भक्तिवेदांत हॉस्पिटलच्या वतीने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व कस्तुरी हॉस्पिटल,खुशी डेंटल कढून ही तपासणी करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी 90042 42210 / 70216 80554 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *