माजी न्यायाधीश ॲड. दुष्यंत कांबळे यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

 

मीरा-भाईंदर : माजी न्यायाधीश तथा ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. दुष्यंत कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि राष्ट्रीय नेते आदरणीय ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त करत वंचित बहुजन आघाडी मिरा भाईंदर जिल्हाध्यक्ष इक्बाल महाडिक यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीमध्ये अधिकृत प्रवेश केला. हा पक्षप्रवेश मीरा-भाईंदर येथे पार पडला.

ॲड. कांबळे यांनी संविधानिक मूल्ये, सामाजिक न्याय आणि बहुजनांच्या हक्कांसाठी सुरू असलेला लढा अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी वंचित बहुजन आघाडी हेच योग्य व्यासपीठ असल्याचे सांगितले.

या पक्षप्रवेशामुळे मीरा-भाईंदर परिसरात वंचित बहुजन आघाडीला बळ मिळणार असून, संविधान रक्षण, समता व न्यायाच्या लढ्याला नवी दिशा मिळेल, अशी प्रतिक्रिया यावेळी उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली.

वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली बहुजन समाजाच्या प्रश्नांसाठी अधिक संघटित आणि निर्णायक संघर्ष उभा राहील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *