महाड (मिलिंद माने) मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर. पोलादपूर जवळ वनविभागाच्या सापळ्यात गुजरात मधून चिपळूणकडे अवैध खैराची तस्करी करणाऱ्या ट्रक सहित त्याला रस्ता दाखवणाऱ्या एका मोटरसायकल स्वराला देखील पकडण्यात वन विभागाच्या महाड येथील पथकाला यश आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ पोलादपूर जवळ MH.१२.EQ९८६६ क्रमांकाचा ट्रक संशयास्पद रित्या जात असल्याचे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले या ट्रक पुढे त्याला रस्ता दाखवण्यासाठी एक दुचाकी स्वार MH. ०३.DQ.६१०९ यामाहा कंपनीचीFZ. मोटर सायकल स्वार असल्याचे वनविभागाच्या तपासणीत आढळून आले
याप्रकरणी आरोपी मोहम्मद अरसद राहणार.गुलशन नगर. हवेली ,जिल्हा बलसाड, गुजरात, व मोहम्मद उस्मान नृद्दिन खान राहणार जनावजी चाळ खिंडीपाडा मुलुंड कॉलनी मुंबई यांना पकडण्यात आले आहे याप्रकरणी भारतीय वन अधिनियम १९२७चे कलम२६(१), फ४१, ४२,६५ अनुसार गुन्हा दाखल केला असून महाड येथील महाड येथील न्यायालयात त्यांना हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणात खैर वृक्षाचे २०१ तुकडे अंदाजे४५७३ घनमीटर असून अंदाजे मालाची किंमत ७०१८६६ असून या प्रकरणात दोन्ही वाहन जप्त करण्यात आले आहे या मोहिमेत उपवन संरक्षक रोहा व सहाय्यक संरक्षक (जकास व कॅम्प) रोहा यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल आशिष पाटील महाड व वनपाल पोलादपूर व अन्य पोलादपूर येथील. वनविभागाचे कर्मचारी वनरक्षक तपासणी नाका पोलादपूर इत्यादी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या तपासात काम केले
चालक बदली केल्याचा संशय?
गुजरात राज्यातून खैराची वाहतूक करून तो चिपळूण येथे नेत असताना संबंधित ट्रक चा अजून एक चालक गुजरात राज्यातला असून त्याला चिपळूणकडील जाणारा रस्ता माहित नये यासाठी पनवेल येथे उतरवून दुसरा चालक वाहन चालवण्यास बसवला असण्याची शक्यता प्राथमिक तपासात वर्तविण्यात येत आहे मात्र नेमका हा ट्रक चिपळूण मध्ये कोणत्या ठिकाणी खाली करण्यात येत होता याबाबत अद्याप स्पष्ट निदर्शनास आलेले नाही
