महाड (मिलिंद माने. )महाड पंढरपूर रस्त्यावर राजेवाडी गावाजवळ बोलेरो पिक अप वाहनातून खैराची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाशकट आरोपीला पकडण्यात वनखात्याला केलेल्या कारवाई खैराची अवैध वाहतूक उघडकीस आली आहे
याबाबत अधिक माहिती अशी की मुंबई व राष्ट्रीय महामार्गावरील राजेवाडी गावाजवळील उड्डाण पुलाजवळ वन खात्याचे कर्मचारी गस्त करीत असताना . एम एच . २३.डब्ल्यू२७७८ या या क्रमांकाच्या पिक अप वाहन संशयास्पद आढळल्याने त्याची तपासणी केली असता खैराचे सोलिव नग ९ घनमीटर ०.००६९ व गाडीच्या हौदामध्ये खैर . सालपा वजन अंदाजे५००. ग्राम आढळून आल्याने या खैराच्या मालाचे वाहतूक केल्या बाबत संदीप उत्तम माने वाहन चालक मालक राहणार कारेगव्हाण तालुका बीड जिल्हा बीड या आरोपीस अटक केली असून त्याच्यावरती भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६(१) फ ४१/ २ब नुसार कारवाई केली असून वाहनाच्या मुद्देमानाचा अंदाजे सहा लक्ष रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी चार दिवसाची पोलीस कस्टडी बनवण्यात आली असून याबाबत उपवनसंरक्षक रोहा व सहाय्यक वन संरक्षक रोहा यांच्या मार्गदर्शनाने वनक्षेत्रपाल महाड व वनपरिक्षेत्राधिकारी आशिष पाटील यांनी पुढील कारवाई केली याबाबतचा तपास चालू केले असल्याचे सांगितले