पोटासाठी ते डोक्यावर टोपली घेऊन पाटण पासून ठाण्यापर्यंत आयुर्वेदिक औषधाचा प्रसार करतात!

 

महाड( मिलिंद माने) संपूर्ण सारे जग ऑनलाइन पद्धतीने जन्मापासून शिक्षणापर्यंत ते नोकरी उद्योगधंदे व शारीरिक औषध उपचाराच्या बाबतीत देखील जग एकीकडे शास्त्रीय पद्धतीने पुढे जात असताना देखील आजोबा-पंजोबाची पुण्याई पार पाडीत २२ वर्ष. सातारा जिल्ह्यातील पाटण पासून ते रायगड पासून ठाणे जिल्ह्यातील उपनगरापर्यंत ते आज देखील आयुर्वेदिक औषधाचा प्रसार करीत जनतेला आयुर्वेदाचे महत्त्व पटवून देण्याचे काम राजाराम झोरे हे करीत आहेत

सध्याच्या युगामध्ये शास्त्रीय पद्धतीने जन्माला आल्यापासून ते मृत्यूच्या दारात जाईपर्यंत सर्वत्र ऑनलाईन पद्धतीने व शास्त्रोक्त पद्धतीने सर्वच बाबतीत जनता अग्रेसर असताना दुसरीकडे आजोबा-पंजोबाची पुण्याई जपण्यात व पोटाची खळगी भरण्यासाठी पारंपारिक आयुर्वेदाचा प्रसार तब्बल २२ वर्ष. एक अवलिया करीत असल्याचे त्यांच्या भेटीअंती पाहण्यास मिळाले
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पाणेरी गावातील राजाराम झोरे नावाचे गृहस्थ कोणतीही लाज न बाळगता डोक्यावर टोपली खाली घोंगडी घेऊन ते आपला दिनक्रम पूर्ण करीत आहेत.

पाटण तालुक्यातील राजाराम झोरे हे. वात, पित्त, खोकला , दमा, गॅस, ऍसिडिटी, मधुमेह, मुतखडा ,संधिवात, मणके दुखी, गुडघेदुखी या सर्व आजारांवर ते आयुर्वेदिक औषधे देत शासकीय कार्यालयापासून ओळखीच्या नागरिकांच्या घरी ते जात असतात

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील राजाराम झोरे पाटण पासून ठाण्या पासून कल्याण ,डोंबिवली, उल्हासनगर ,उरण या ठिकाणी ते आयुर्वेदिक औषध घेऊन डोक्यावर टोपली व डोक्याखाली घोंगडी अशा पारंपारिक विषयात ते फिरत असतात. ज्यांना आयुर्वेदिक औषधे दिली त्यांना याच्यापासून लाभ झाला असल्याचे राजाराम झोरे यांनी यावेळी सांगितले त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक९०७६२८०४९५. असा असून यावरती संपर्क केल्यास व आपणास कोणत्या पद्धतीचे कोणत्या उपचारा वरती औषध आहे ते मी देत असल्याचे त्यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *