मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपूल (फ्लाय ओव्हर )धोकादायक स्थितीत; राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे दुर्लक्ष? 

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर. उड्डाणपूल (फ्लाय ओव्हर )धोकादायक स्थितीत

पुलावरील रस्त्याला तडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे दुर्लक्ष?

महाड (मिलिंद माने) मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग. क्रमांक ६६ च्या चौपदरीकरणाचे काम मागील १८ वर्षापासून. सुरू झाले असले तरी ते अद्याप पूर्णत्वास येण्याअगोदरच अनेक ठिकाणी रस्त्याला तडे गेले आहेत तशीच परिस्थिती रायगड जिल्ह्यातील पोलादपूर पासून पनवेल जवळील पळस्प्यापर्यंत असणाऱ्या उड्डाण पुलावरील( फ्लाय ओव्हर) वरील सिमेंटच्या रस्त्यांना तडे गेले असून चालू वर्षीच्या पावसाळ्यात या ठिकाणचे रस्ते खचून अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग अद्याप . सुस्त अवस्थेत असल्याचे चित्र या निमित्ताने अधोरेखित होत आहे

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक६६. च्या कामाला तब्बल १८ वर्षाचा . कालावधी झाला असतानाही अद्याप रस्ता पूर्ण होण्याचे नाव घेत नाही त्यातच अनेक ठिकाणी सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांना तडे गेले असून यामुळे रस्त्यांवर खड्डे पडले असतानाच आता या महामार्गावरील उड्डाण पुलावर (प्लाय ओवर) असणाऱ्या सिमेंट काँक्रेट च्या रस्त्याला देखील तडे गेले असून अनेक ठिकाणी रस्ते खचले असून त्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साठले असून त्यामुळे या कटलेल्या भागात खड्डे पडले आहेत उड्डाण पुलावर अनेक ठिकाणी खड्ड्यांच् साम्राज्य निर्माण झाले आहे यामुळे पुलावरील खड्डे चुकवण्याच्या नादात रात्री अप रात्री महामार्गावर अपघात घडण्याच्या घटना वारंवार होत आहेत मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे अधिकारी यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून ठेकेदार देखील झोपी गेलाय का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे

 

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोणत्या ठिकाणच्या. उड्डाण पूलांवरील सिमेंटच्या रस्त्यांना तडे गेले आहे त्या पूलांची नावे पुढीलप्रमाणे;

पोलादपूर जवळील चाडवे येथील पूल, नागलवाडी, महाड येथील विसावा हॉटेल जवळील पूल, महाड नाते खिंड येथील पूल, वहूर पूल, विरगाव, विर रेल्वे स्टेशन, तळेगाव वाडी, लोणारे येथील रिलायन्स पंपा जवळील उड्डाणपूल मुगवली फाटा जवळील ओपन अम्ब्रेला जवळील पूल, खांब येथील पूल, वाकण फाटा नागोठणे ते पेण दरम्यानच्या सर्वच उड्डाणपुलावर खड्ड्यांचे साम्राज्य पाहण्यास मिळत आहे वडखळ येथील उड्डाण पुराने तर कहर केला आहे मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या खड्ड्यात वाहने जोराने आदळल्याने आत मधील प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर मान दुखी ,कंबर दुखीचा त्रास. होत आहे मात्र या पुलावरील खड्डे भरण्याचे नाव राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अधिकारी करताना दिसत नाही

या ठिकाणच्या पूलांवर मोठ्या प्रमाणावर सिमेंटच्या रस्त्याला तडे गेले असून त्याच पद्धतीने सुकळी खिंडीत असणाऱ्या खिंडीमधील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याला देखील मोठ्या प्रमाणावर तडे गेले असून येत्या पावसाळ्यात हे सिमेंट काँक्रीटचे रस्ते . अस्तित्वात राहणार नसल्याची शक्यता निर्माण झाली आहे त्याचा परिणाम वाहने एकमेकाला धडकून अपघात होण्याची शक्यता वाहतूकदारांकडून वर्तवली जात आहे निकृष्ट दर्जाच्या सिमेंट काँक्रीट रस्त्यामुळे अनेक गाड्या घसरण्याचे प्रकार देखील पर्जन्यवृष्टीच्या काळात घडत आहेत

 

एकंदरीत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला कोणी वाली उरला नाही अशी अवस्था मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची झाली आहे कोकणातील गणेशोत्सव हा दोन महिन्यांवर येऊन ठेपला असताना या निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांमुळे व निकृष्ट दर्जाच्या पूलांच्या बांधकामामुळे ऐन गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही

 

कोकणातील मंत्री खासदार आमदार मूग गिळून गप्प का?

मुंबई व राष्ट्रीय महामार्ग वरील पळस्पे फाटा ते पोलादपूर पर्यंतच्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर व उड्डाण पुलावर मोठ्या प्रमाणावर रस्त्यांना तडे गेले असून अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य तयार झाले असताना या महामार्गावरून रायगड जिल्ह्यातील मंत्री तसेच रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंत्री ,खासदार, आमदार, यासह अनेक व्हीआयपी व्यक्ती प्रवास करतात मात्र त्यांना या रस्त्यावरील खड्डे दिसत नाहीत का? दिसत असूनही ते गप्प का? ठेकेदाराची हित तर सांभाळत नाहीत ना असा सवाल या महामार्गावरून प्रवास करणारे गोरगरीब जनता या मंत्री ,खासदार व आमदारांना विचारत आहे

 

खड्डे भरण्यासाठी दरवर्षी ५०० कोटी?

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ च्या. कामाला सुरुवात होऊन आज तब्बल १८ वर्षाचा कालावधी. होत असताना देखील या महामार्गाचे काम अद्याप पूर्ण होत नाही दरवर्षी पावसाळ्यात या महामार्गाच्या दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणावर खड्डे पडतात या खड्ड्यात मधून कोकणातील चाकरमानी प्रवास करतात महामार्गावर खड्डे पडले की प्रवाशांची बोंबाबोंब चालू होते नेमका त्याचाच फायदा राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अधिकारी व लोकप्रतिनिधी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय ,मंत्रालय. या ठिकाणी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांच्या प्रश्नाबाबत बैठक आयोजित करतात या बैठकीतून केवळ खड्डे भरण्याच्या नावाखाली व तात्पुरती मलमपट्टी करण्याच्या नावाखाली दरवर्षी सुमारे ५०० कोटी रुपये खड्डे भरण्याच्या नावाखाली आज पर्यंत खर्च झाल्याची चर्चा राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या एका अधिकाऱ्याने खाजगीत बोलून दाखवली

 

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची श्वेतपत्रिका काढा?

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम ज्या वर्षापासून चालू झाले आहे ते आज जुलै २०२५ पर्यंत प्रत्येक वर्षी पावसाळ्या मध्ये या महामार्गाच्या खड्डे भरणाच्या कामात किती निधी खर्च झाला याची श्वेतपत्रिका काढली तर कोकणातील चाकरमान्यांचे डोळे पांढरे होतील ज्या पद्धतीने मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचे काम केवळ तीन वर्षात पूर्ण झाले मग मुंबईत व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ च्या. कामाला १८ वर्षाहून अधिक काळ लोटला असताना देखील. या महामार्गाचे काम का पूर्ण होत नाही याबाबत कोकणातील लोकप्रतिनिधींना काहीच पडले नाही का? केवळ निवडणुका आल्या की महामार्गाचे काम पूर्ण करण्याची तारीख जाहीर करायची मात्र निवडणुका संपल्यानंतर या महामार्गाच्या कामाबाबत केवळ धावते दौरे आयोजित करून जनतेसमोर देखावा सादर करावयाचा एवढेच काम कोकणातील लोकप्रतिनिधींना जमते का? या महामार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या ज्या चाकरमान्यांचे रस्ते अपघातात बळी गेले आहेत तसेच जे कायमचे जायबंदी झाले आहेत त्यांचे काय? याबाबत ना राज्य सरकार कोणती भूमिका घेत ना केंद्र सरकार याबाबत काही भूमिका स्पष्ट करताना दिसत मग मृत्युमुखी पडलेल्या व कायमच्या जायबंदी झालेल्या प्रवाशांची नुकसान भरपाई बाबत काय अशा सवाल या महामार्गावरून जाणारे असंख्य प्रवासी व कोकणकर जनता या लोकप्रतिनिधींना विचारीत आहेत एकंदरीत मागील १८वर्षाची पुनरावृत्ती. यावर्षी देखील या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना अनुभवायला मिळणार आहे या निकृष्ट दर्जाच्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांमुळे गणपतीच्या सणामध्ये पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागणार आहे

माणगाव व इंदापूर मधील डांबरीकरण चा दर्जा व सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याच्या दर्जा?

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव व इंदापूर या दोन पट्ट्यांमध्ये असणाऱ्या राष्ट्राचे डांबरीकरण करण्यात आले आहे मात्र या डांबरीकरणाचा दर्जा ज्या पद्धतीने राखला आहे त्याच पद्धतीने या मार्गावर असणाऱ्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याच्या दर्जा का राखला जात नाही? असा सवाल देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *