खेतवाडीत अवजड साहित्य वाहून नेणाऱ्या हातगाड्यांचा छायाचित्रांचे प्रदर्शन हातगाड्यावरबंदी घालण्यासाठी नागरिकांनी उभारली सह्यांची मोहीम

खेतवाडीत अवजड साहित्य वाहून नेणाऱ्या हातगाड्यांचा छायाचित्रांचे प्रदर्शन

हातगाड्यावर बंदी घालण्यासाठी नागरिकांनी उभारली सह्यांची मोहीम

मुंबई ( मिलिंद कारेकर ) : गणेश उत्सवासाठी प्रसिद्ध असणाऱ्या गिरगावातील खेतवाडी परिसरात सध्या हातगाड्यावरून वाहून नेणाऱ्या अवजड वस्तूंच्या वाहतूकीमुळे स्थानिक लोक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. अनेक तक्रारी केल्यानंतर देखील हातगाड्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे स्थानिकांनी सरकारला जाग करण्यासाठी हातगाड्यांच्या छायाचित्रांचे खास प्रदर्शन भरवत सह्यांची मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेला नागरिकांनी स्वाक्षरी करून मोठ्या प्रमाणात हजेरी लावत खेतवाडी कुंभारवाडा परिसरातून हातगाड्या कायमचा हदपार करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

खेतवाडी, कुंभारवाडा, गुलालवाडी नळबाजार अलंकार सिनेमा, डी बी मार्ग परिसरात मोठ्या प्रमाणात मेटल मार्केट, ट्रान्सपोर्ट कंपन्या, इलेक्ट्रॉनिक, मोटर स्पेअर पार्टची दुकाने आहेत. चार चाकी वाहनांबरोबर अवजड मालाच वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात हातगाड्यांचा वापर केला जातो. नीयामा पेक्षा जास्त, लोखंडी लांबीचे लोखंडी पाईप, सळ्या, ग्रील पत्रे अश्या आवजड धातूंची आणि मोठ मोठ्या वस्तूंची ह्या हातगाड्यांवरून  ने आण केली जाते त्यामुळे अनेकांच्या हातापायाला दुखापती होत असतात. नागरिकांनी तक्रार केल्यास मनपा पोलिसांकडन डोळे झाक केली जाते आसल्याच आरोप स्थानिकांनी केला आहे.दिवसा गणिक जवळपास १५,००० हुन जास्त हातगाड्याची रेलचेल ह्या परिसरात सुरू असते.

गेल्या नऊ वर्षापासून स्थानिक नागरिकांकडून हातगाड्या, ट्रक,टेम्पो ,कंटेनर अश्या अवजड मालाची वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर बंदीसाठी तक्रारी केल्या आहेत. वाहतूक विभाग पोलीस प्रशासन, मुंबई महानगरपालिकेकडे सतत पाठपुरावा सुरू आहे. पण स्थानिकांच्या तक्रारींकडे लक्ष देण्यासाठी संबंधित खात्यातील अधिकारी उदासीन असल्याचे स्थानिकानी आरोप केला आहे. त्यामुळे दिवसेन दिवस खेतवाडी परिसरातील अवजड वाहनांचा प्रश्र्न गंभीर होत चालला आहे. 

ह्या संपूर्ण परिसरात रहिवासी वस्ती जास्त असल्याने फळभाजी विक्रेत्यां प्रमाणे इथले अवजड उद्योग पनवेल कळंबोलीत हलवण्याचे १९८९ साली शासनाच्या आदेशाला व्यवसायिकांनी हरताळ फासला आहे. यांच्यावर कारवाई करणारी अधिकारीच पैशासाठी विकले गेल्याचा आरोप  करत   गिरगाव रेसिडेन्स असोसिएशन ह्य सामाजिक संस्थेच्या वतीने बॅनर झळकावून अवजड साहित्य वाहून हातगाड्यांचा छायाचित्रांचे प्रदर्शन भरवून शासनाचे डोळे उघडण्या करता सह्यांची मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेल नागरिकांनी आपली स्वाक्षरी नोंदवत मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. अवजड मालाची वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर कारवाई करण्यात आली नाहीच तर येत्या काळात रहिवासी एकत्र मिळून उपोषण करणार असल्याचे माहिती संस्थेचे सेक्रेटरी शाम अहेर यांनी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *