महाड दापोली राज्य मार्गावर पुणे फौजी अंबवडे एसटी बस घसरून झालेल्या अपघातात चालक वाहकासहित आठ प्रवासी जखमी

 

महाड (मिलिंद माने) महाड दापोली राज्य मार्गावर मे महिन्यापासून चालू झालेली अपघातांची मालिका जुलै महिना संपत आला तरी देखील चालू असून आज दुपारी दोनच्या सुमारास मांडवकर कोंड जवळ पुणे फौजी अंबवडे अहिरे कोंड ही एसटी बस रस्त्यावरून घसरून झालेल्या अपघातात एसटी बस मधील चालक वाहकासहित आठ प्रवासी गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना महाड मधील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

महाड दापोली राज्य मार्गावरील मे महिन्यापासून चालू झालेल्या अपघातांच्या मालिकेचे जुलै महिना संपत आला तरी . थांबण्याचे नाव अद्या प घेत नाहीत आज दुपारी पुणे (पिंपरी चिंचवड) आगाराची पुणे फौजी अंबावडे अहिरे कोंड एम एच .०७. C. ९०४३ ही बस मांडवकर कोंड गावाजवळ जवळ आली असता उतारा मध्ये पाऊस पडत असल्यामुळे व रस्ता निसरडा असल्याने रस्त्यावरून घसरून झालेल्या अपघातात बस मधील चालक वाहकासहित आठ प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत.

पुणे फौजी अंबवडे (अहिरे कोंड) या बस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी आठ प्रवाशांना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या एसटी बसचे चालक यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे तर महिला वाहक हिच्या हाताला मोठ्या प्रमाणावर गंभीर दुखापत झाली असून कमरेला देखील मोठी दुखापत झाल्याने त्यांना शिरगाव ग्रामपंचायतचे सरपंच सोमनाथ ओझरडे यांनी आपल्या खाजगी वाहनातून महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे यापैकी काही जखमींना महाशक्ती ॲम्बुलन्स चे अनिल चव्हाण यांनी आपल्या रुग्णवाहिकेतून महाड ग्रामीण रुग्णालयात आणले.


महाड दापोली राज्य मार्गावर अपघात त्यांची मालिका पुन्हा एकदा रस्ता निसरडा झाल्यामुळे चालू झाली असून एसटी महामंडळाच्या बसेस अपघात झाल्यानंतर देखील मे महिन्यामध्ये निकृष्ट दर्जाचे डांबर वापरून रस्त्यावर शिलकोट मारून डांबरीकरण करण्याचा उद्योग करणाऱ्या एफएमसी कंट्रक्शन कंपनी विरोधात अद्यापी सार्वजनिक बांधकाम खाते का गुन्हा दाखल करीत नाही असा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा निर्माण झाला आहे
महाड दापोली राज्य मार्गावर आज झालेल्या एसटीच्या अपघातामुळे गणेशोत्सव काळात या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांची संख्या लक्षणीय असल्याने ऐन गणेशोत्सवात या मार्गावर होणाऱ्या अपघाताला जबाबदार कोण असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे
या बसमधील जखमी प्रवाशांची चालक वाहक आहेत नावे पुढीलप्रमाणे
१) अविनाश पांडुरंग लोखंडे ३४वर्ष राहणार पिंपरी चिंचवड चालक
२) पौर्णिमा . प्रमोद होन कडसे ४६ वर्ष वाहक राहणार पुणे
३) आशाबाई नारायण जाधव राहणार फौजी आंबवडे ७५ वर्ष
४) शारदा गजानन शेलार ६७ वर्ष राहणार फौजी अंबवडे
५) सोहम ज्ञानेश्वर पवार १७ वर्ष राहणार फौजी अंबवडे
६) सिमाब सिकंदर पेडेकर१६ वर्ष राहणार शिरवली
७) सलवा अब्दुल सलाम पेडेकर वय वर्ष १७राहणार शिरवली
८) आराधना दिगंबर पवार वय वर्ष १८राहणार फौजी अंबवडे
९) लहू सखाराम पाते वय वर्ष ५५ राहणार पांगरी
१०) विश्वजीत सोपान कदम वय वर्ष २७ राहणार शिरवली
या जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून एसटी महामंडळामार्फत किरकोळ जखमींना अर्थसहाय्य देऊन त्यांना महाड ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *