महाड, प्रतिनिधी : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड नजीक नीलकमल हॉटेल शेजारी. असणाऱ्या एका मोठ्या झाडाची फांदी . कंटेनर वर पडून अपघात झाला मात्र सुदैवाने कंटेनर मधील मधील चालक बचावला.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याच्या चौपदरीकरणामध्ये चौपदरीकरणास अडथळा ठरणारे वृक्ष काढून टाकण्यात आले आहेत. मात्र अडथळा न ठरलेले वृक्ष कांहीं प्रमाणात तसेच ठेवले आहेत. महाड तालुक्यातील वहूर गावच्या हद्दीत नीलकमल हॉटेल शेजारी आजही महाकाय वृक्ष तसेच ठेवले आहेत. याच फांद्या वाचवत मार्गावरून एक कंटेनर चालक महमद अन्वर शहा रा. युपी हा गेली वर्षभर आपला कंटेनर नेत आहे. गोव्यावरून मुंबईला निघाल्यानंतर या ठिकाणी आल्यावर तो नेहमी सावधगिरी बाळगत असे. या झाडाची फांदी कधी आपल्या कंटेनरला लागून आपले मोठे नुकसान होईल किंवा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही गेली वर्षभर हा या ठिकाणी भीती बाळगत ट्रॅक चालवताना काळजी घेत होता.
आज पहाटे हाच कंटेनर चालक आपला कंटेनर क्रमांक एम एच ०६-ए क्यू ३८६६ या ठिकाणाहून मुंबई दिशेला जात असताना मागून एक कार या कंटेनरला ओव्हरटेक करत होती त्यामुळे हा कंटेनर झाडाच्या खालून निघाला ज्या घटनेची भीती होती ती घटना अखेर घडली. ती झाडाची फांदी या कंटेनर मध्ये अडकली आणि तुटली. जवळपास तीन टनाची फांदी 200 मीटर अंतरापर्यंत फरपटत गेली या घटनेमध्ये कंटेनर ची केबिन चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले मात्र चालक बचावला.