महाराष्ट्राचे विकासपुरुष सन्माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावरचे पित्याचे छत्र अकाली हरपले ते एका दुर्धर आजारामुळे.त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे दुर्धर आजारांच्या व उपचारांच्या बाबतीत समाजकार्यात येण्यापूर्वीपासूनच अतिशय संवेदनशील आहेत.राजकारणात पाऊल टाकताना व नागरी समस्या सोडवताना अन्य विषयांबरोबरच त्यांनी रुग्णसेवेला महत्त्वाचे स्थान दिले.
देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरकरांसाठी कर्करोग उपचार केंद्र उभारण्याचे स्वप्न पाहिले.यावर २००१ मध्ये जेव्हा काम सुरू झाले, तेव्हा असे दिसून आले की, त्या वेळी बहुतेक कर्करोगाचे रुग्ण एक तर मुंबईतील टाटा कर्करोग रुग्णालयात किंवा दक्षिणेतील ज्ञात रुग्णालयात जात होते. दक्षिणेत, उपचार आणि रुग्णालये चालवण्याच्या नावाखाली विविध संस्थांकडून रुग्णांची लूट तसेच धर्मांतर चालू होते. नातेवाईकांबरोबरच असहाय्य रुग्णही या रॅकेटचे बळी ठरत होते.
नागपूरमधील प्रत्येक व्यक्तीसाठी, मग ती श्रीमंत असो किंवा गरीब, जागतिक दर्जाचे कर्करोग उपचार केंद्र उभारण्याचे स्वप्न देवेंद्र फडणवीस यांनी पाहिले.
२०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर अत्यंत व्यस्त असूनही त्यांनी हे काम सुरू केले आणि एक मिशन म्हणून पूर्णत्वास नेले. सर्वांना परवडेल अशा मोठ्या रुग्णालयाची निर्मिती केली.
देवेंद्रजींनी रुग्णसेवेचे हे काम एक मिशन म्हणून हाती घेतले आणि आरोग्य सेवा करणारी एक महान संस्था उभी केली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक आदरणीय मोहनजी भागवत, तत्कालिन मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नितीन गडकरी यांच्या हस्ते रतन टाटा यांच्यासारख्या अनेक आघाडीच्या उद्योजकांच्या उपस्थितीत २०२३ मध्ये ‘राष्ट्रीय कर्करोग संस्थेचे’ उद्घाटन करण्यात आले.
देवेंद्र जी १९९९ साली पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले व त्यांचे मुंबईला येणे जाणे वाढले. एक आमदार म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भ, मराठवाडा,खानदेश येथून मुंबईला दुर्धर रोगांच्या उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना मदत करण्यास सुरुवात केली.त्यात त्यांना आमदार गिरीश महाजन व त्यांचे सहाय्यक डॉक्टर रामेश्वर नाईक यांची खूप मदत झाली.
गेली २४ वर्षे देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्या प्रेरणेने व मदतीने डॉक्टर रामेश्वर नाईक हे कोणतेही सरकारी पद न भूषवता महाराष्ट्रभरातून येणाऱ्या रुग्णांच्या सेवेत रुजू आहेत.संपूर्ण महाराष्ट्रभरातून मुंबईत उपचारासाठी येणाऱ्या सर्व रुग्णांसाठी डॉक्टर रामेश्वर नाईक हे एका दिपस्तंभाप्रमाणे काम करत आहेत.डॉक्टर रामेश्वर नाईक यांना रुग्णसेवेचा प्रदीर्घ अनुभव आहे. दुर्धर आजारांच्या उपचारांच्या वेळी रुग्णांना येणाऱ्या सर्व समस्यांची त्यांना सखोल माहिती आहे. त्यामुळेच मा.मुख्यमंत्र्यांनी रामेश्वर नाईक यांची नियुक्ती “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” विभागाच्या प्रमुखपदी केली आहे.
“मुख्यमंत्री सहाय्यता निधी” विभागाच्या प्रमुखपदी डॉ. रामेश्वर नाईक यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन व त्यांना शुभेच्छा.