मुंबई – बृहन्मुंबई पोलीस आयुक्त पदी असणारे विवेक फणसळकर हे 30 एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाले असल्याने त्यांच्या जागी देवेन भारती यांची बृहन्मुंबई पोलीस आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे
बृहन्मुंबई पोलीस आयुक्त पदी असणारे विवेक फणसळकर हे वयोमानानुसार ३० एप्रिल रोजी. सेवानिवृत्त होत असून त्यांच्या जागी विशेष पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असणारे देवेन भारती यांची बृहन्मुंबई पोलीस आयुक्त पदी नियुक्ती केल्याचे पत्रक राज्य शासनाच्या गृह विभागाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी काढलेल्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे
महाराष्ट्र पोलीस अधिनियम(१९५१. चा२२) याच्या कलम २२ न मधील तरतुदीनुसार विवेक फणसळकर हे सेवानिवृत्त झाल्यानंतर रिक्त होणाऱ्या जागेवर सध्या मुंबई पोलीस दलात विशेष पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असणारे देवेन भारती यांची पदस्थापना बृहन्मुंबई पोलीस आयुक्त म्हणून करण्यात आली आहे