सहकाराच्या माध्यमातून कोकणचा विकास शक्य .! भाजपा गटनेते व मुंबई बँक अध्यक्ष प्रवीण दरेकर

सहकाराच्या माध्यमातून कोकणचा विकास शक्य .! भाजपा गटनेते व मुंबई बँक अध्यक्ष प्रवीण दरेकर

 

महाड (प्रतिनिधी: मिलिंद माने) कोकणी माणसाचे वैशिष्ट्य असे आहे की त्यांच्या अंगी लबाडी नाही मिळेल त्यात समाधान मानणारा कोकणी माणूस आहे अशा या कोकणी माणसाचा व कोकणातील जिल्ह्याचा विकास साधायचा असेल तर सहकाराच्या माध्यमातून हा कोकणचा विकास शक्य असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेतील भाजपा गटनेते तथा मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी बोलताना स्पष्ट केले

 

 

आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने. महाड येथील जनकल्याण सहकारी पतसंस् पतसंस्थेने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत प्रमुख वक्ते म्हणून बोलताना भाजपाचे विधान परिषदेतील गटनेते तथा मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर या प्रसंगी बोलताना म्हणाले की ज्यांच्या पुढाकारांना हा कार्यक्रम संपन्न होतोय ते संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष अजय जोगळेकर उपाध्यक्ष दिलीप पार्ट सहायक निबंध तुषार लाटणे जलकल्याण पतसंस्थेचे संचालक अनिल गोरेगावकर, रवींद्र पांडे ,प्रकाश कोळवणकर, सुनील पलंगे , समीर बुटाला, ममता मेहता , वैशाली शिंदे ,बिपिन बामणकर, सुधीर महाडिक, श्रीधर सकपाळ यांच्यासह महाड, पोलादपूर तालुक्यातील अनेक पतसंस्थेचे अध्यक्ष संचालक मंडळ या व्याख्यानाच्या निमित्ताने उपस्थित . वीरेश्वर मंदिर सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थित होते

 

यावेळी बोलताना मुंबई जिल्हा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व भाजपाचे विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर म्हणाले की या कार्यक्रमाला मला

५० लोकांची अपेक्षा होती या ठिकाणच्या सभागृहात दहा-पंधरा खुर्च्या कमी दिसतात त्याचा शल्य आयोजकांच्या मनात असेल परंतु महाड तालुक्यात एवढी लोक सहकारासाठी उपस्थित आहेत हे कमी नाहीये त्याच्यामुळे निश्चितच महाड आणि पोलादपूर तालुक्याच्या भविष्यातल्या सहकाराच्या वाटचालीसाठी एक चांगला शुभ सकाळचा कार्यक्रम आहे असे मी या ठिकाणी मांडतो खरं म्हणजे सहकार सहकाराच्या माध्यमातून होणाऱ्या विकास समाजाला होणार सहकार्य हे फार मोठे आहे

 

महाराष्ट्राला सहकाराची फार मोठी वैभवशाली परंपरा किंबहुना महाराष्ट्राचा विकासच विशेषता ग्रामीण भागाचा सहकाराच्या माध्यमातूनच या ठिकाणी झालेला आहे आणि ग्रामीण अर्थव्यवस्था त्याच्यामध्ये या सहकार चळवळीचा फार मोठं योगदान आहे खरं म्हणजे ७० ते ८० च्या दशकामध्ये सहकार अत्यंत उत्तम होता परंतु ९० नंतर या ठिकाणी सहकार क्षेत्राला ज्या पद्धतीने गती मिळायला पाहिजे होती उर्जेता अवस्था यायला पाहिजे होती ते त्या ठिकाणी मिळाली नाही आणि त्याच्यामुळे अलीकडच्या काळामध्ये त्या ठिकाणी सहकाराला खऱ्या अर्थाने मार्गदर्शनाची आवश्यकता आहे या अडचणीच्या सहकारी संस्था आहेत त्यांना पुन्हा सक्षम करण्यासाठी मदतीची आवश्यकता आहे आणि म्हणून अशा प्रकारचा कार्यक्रम घेणे आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने अत्यंत समर्पक असा आहे

 

पश्चिम महाराष्ट्राचा विकास जो मोठ्या प्रमाणावर झाला त्याच्यामध्ये . सहकाराचे फार मोठे योगदान आहे कारण ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रकारच्या सहकारी संस्था उभ्या राहिल्या आणि त्या संस्थांच्या माध्यमातून तिथल्या लोकांना रोजगार मिळाला अनेक छोटे-मोठे उद्योगधंदे उभे राहिले आणि तिथल्या लोकांच्या आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारचे त्या ठिकाणी सहकाराच्या माध्यमातून दिवस आले एखादा सहकारी साखर कारखाना झाला तो केवळ कारखाना होत नसतो तर त्या कारखान्यावरती ४०,०००त्या तालुक्यातल्या कारखान्यात क्षेत्रातील सभासद आपला ऊस टाकत असतात आणि त्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखान्याच्या माध्यमातून लगत अशा प्रकारचे पैसे मिळत असतात आजूबाजूला छोटे छोटे उद्योगधंदे उभे राहतात कारखान्याच्या शिक्षण संस्था . उभ्या राहतात कारखान्याला संलग्न असणारे छोटे छोटे उद्योग उभे राहतात त्याच्यामुळे एक कारखाना उभा राहिला तर त्या तालुक्याचे चित्र बदलण्याची क्षमता त्या सहकारी साखर कारखान्यामध्ये असते तसेच

सहकारी सूतगिरण्या उभ्या राहिल्या वेगवेगळ्या प्रकारच्या मोठ्या सहकारी संस्था उभ्या राहिल्या आणि मोठ्या संस्थांबरोबर छोट्या-छोट्या संस्था विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून सुद्धा गावांमध्ये त्या ठिकाणी पोचल्या आणि आपण बघा मोठ्या संस्थेवर आपल्याकडे नाही पश्चिम महाराष्ट्रात किती ग्रामीण भागात गेला तर तिथे पाणीपुरवठ्याची पण सहकारी संस्था असते म्हणजे एखाद्या कॅनल मध्ये पाणी उचलायचा असेल तर ते आजूबाजूच्या गावातील लोक एकत्रित येतात पाणी पुरवठा वितरण त्या ठिकाणची संस्था करतात आणि त्या संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाणीपुरवठा केला जातो त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था आहेत आणि त्या संस्थांच्या माध्यमातून त्या ठिकाणी समाजाला मदत करण्याचं काम त्या ठिकाणी होत असतं त्या ठिकाणी विकास व्हायला पाहिजे सहकाराला त्या ठिकाणी गती मिळायला पाहिजे होती ती गती त्या ठिकाणी मिळाली मात्र कोकणात ती मिळू शकली नाही याची त्या ठिकाणी अनेक कारण आहे एक म्हणजे आपण बघितलं की मूळ सहकार आपल्याला माहीत नसतं संस्था नोंदणी कशी करावी संस्था नोंदणी केली तर ती नोंदणी केल्यानंतर संस्था चालवावी कशी मोठी कशी करावी आणि त्याच्यामुळे योग्य मार्गदर्शन नसल्या कारणाने आपण आपल्याला जे काही समजतं ते आधारे आपण ती संस्था त्या ठिकाणी वाढवत असतो आणि त्याच्यामुळे ज्या पद्धतीने प्रगती आपल्या कोकणातल्या सहकारी संस्थांची व्हायला हवी ती दुर्दैवाने या ठिकाणी होऊ शकली नाही वस्तुस्थिती आहे

 

ठाण्यापासून अगदी सिंधुदुर्ग पर्यंत घेतलं तर त्या ठिकाणी आपण सहकारात काम करणारे चांगली लोकंही चांगल्या संस्था ही आहेत कारण आपल्या कोकणातल्या माणसाचं वैशिष्ट्य आहे की त्या ठिकाणी लबाडी करायची नाही करायची किंबहुना किंवा आहे त्याच्यात समाधान मानणारा आपला कोकणचा माणूस आहे बाबा मिळते त्याच्यात समाधानी आहोत

 

चालले ना आमची दहा कोटीची आहे बाबा 11 कोटीची होतील बारा कोटीची होईल बाकीच्यांची एकदम दहा कोटी वंदना शंभर कोटीवर गेली पाहिजे

 

आज मला सांगायला अभिमान वाटतो की राज्यामध्ये जवळपास ३६ जिल्हा मध्यवर्ती बँक आहे त्याच्यामध्ये ज्या काही उत्तम सात आठ बँका आहेत त्यातल्या कोकणातल्या सहाच्या सहा बँका आहेत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक , रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक , ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक , आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक त्या बँकेचा मी अध्यक्ष ही सगळ्यात सर्वोच्च आहे त्याच्यामुळे आपण जिथे ज्या बँका चालवतो त्या बँका चांगल्या पद्धतीने . आपली मंडळ चाल वतोय म्हणजे कुठल्याही पक्षाचे असो कोणी असो त्याच वेळेला आपण जर त्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातल्या किंवा विदर्भातल्या विशेषता विदर्भ किंवा मराठवाड्याच्या जर आपण जिल्हा मध्यवर्ती बँका घेतल्या अनेक जिल्हा बँकांमध्ये घोटाळे त्या ठिकाणी झालेले पाहायला मिळतील म्हणजे अगदी विदर्भाचे नागपूर बँके , वर्धा घ्या बुलढाणा बँकेत सगळ्या बँका बंद . पडून डबघाईला आल्या कारण तिथल्या लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे गैरव्यवहार केले चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी काम केलं आणि म्हणूनच त्या बँका त्या ठिकाणी बंद अवस्थेत आहेत

 

या जिल्हा मध्यवर्ती बँकांचा उपयोग महाराष्ट्रातल्या सहकारी संस्थांना होतात आता सिंधुदुर्ग जिल्हा बँक पैसे कोणाला देते महाराष्ट्रातल्या सहकारी साखर कारखाने रत्नागिरी बँक पैसे कोणाला देते महाराष्ट्रातल्या शिक्षण संस्था सहकारी संस्थांना रायगड बँक कोणाला देते राज्य सहकारी बँकेवर कन्सर्शिअम मध्ये महाराष्ट्रातल्या सहकारी संस्थांना प्रकल्पांना ठाण्याचं ते मुंबई मी याचा उल्लेख यासाठी केला की आपण पैसे देणे चुकीचे नाही आपल्या पैसा आपल्या बँकेत या ठिकाणी महाराष्ट्राच्या संस्थांना ताकद देऊ शकतात परंतु आमच्यातला कोण कार्यकर्ता पुढे येत नाही की मी काहीतरी करतोय मी एकानी सहकारी संस्था उभी करतोय आम्हाला पैसे द्या आम्ही या ठिकाणी ती संस्था मोठी करून ताकदवान करू अशा प्रकारचं नेतृत्व जोपर्यंत तुमच्याबद्दल घडत नाही तोपर्यंत सहकार हा गावागावात त्या ठिकाणी ताकतीने रुजू शकत नाही आणि म्हणून मला समाधान म्हणजे मला वाटलं कार्यक्रम काय परंतु मी अशा प्रकारचे एक चांगली संकल्पना आपण घेऊन कार्यक्रम केला ज्याची मला अपेक्षा होती कारण मगाशीच मी आमच्या लाटणे यांना सांगितले आमच्या महाडमध्ये, पोलादपूर तालुक्यामध्ये जेवढ्या तुमच्याकडे नोंदणीकृत संस्था आहे चालू आहे बंद आहे लिक्विडेशन मध्ये आहेत या सगळ्या संस्थांचे शिबिर लावा आणि त्या संस्थांनी कशा पद्धतीने वाटचाल करावी त्यांना नेमके अडचणी काय आहे त्याला पुढे जाण्यासाठी काय करावे लागेल आणि या संस्था सशक्त झाल्या तर त्याचा उपयोग आपल्या इथल्या सर्वसामान्य माणसाला कशा पद्धतीने होऊ शकतो हे त्याची छोटी झलक आज जनकल्याण. पतसंस्थेने या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिले याचा मला निश्चितच मनापासून त्या ठिकाणी आनंद आहे

 

या सर्व मंडळींनी त्या ठिकाणी पुन्हा लक्ष घातलं आणि आज बऱ्यापैकी चांगली वाटचाल या संस्थेची त्या ठिकाणी सुरू आहे आज आपल्याकडे पाहिलं तर या महाड . पोलादपूर तालुक्यामध्ये दोन-चार पत् संस्थापन नसतील की ज्या ठिकाणी ताकतीच्या आज आपण बघाल की ज्ञानदीप सहकारी संस्था साताऱ्यावरून महाडला येऊन कामकाज करते साताऱ्याची संस्था येऊन पोलादपूरला त्या ठिकाणी काम करते. राज्यात कुठेही कुठल्या संस्थेच्या काम करावं परंतु आमच्या इथल्या लोकांना असं का वाटत नाही की माझी संस्था मजबूत झाली पाहिजे आणि माझ्या संस्थेच्या माध्यमातून इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला असेल सर्वसामान्य माणूस व्यापारी आहे फेरीवाला आहे त्याला माझ्या संस्थेच्या माध्यमातून मदत झाली पाहिजे अशा प्रकारचा विचार येण्याची आवश्यकता आणि बघा की सहकारात प्रचंड ताकद आहे आज प्रवीण दरेकर आपल्यासमोर उभा आहे त्याच्यामुळे सगळ्यात श्रेय आणि कशामुळे मी जर इथपर्यंत आलो असेल तर त्याचं प्रमुख कारण सहकार आहे मी सहकार् मध्ये लक्ष घातलं म्हणूनच त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने वाटचाल करत आज तुमच्यासमोर मार्गदर्शन करायला या ठिकाणी उभा आहे आणि म्हणून संस्था असली की काय आपण करू शकतो आज मी एका जिल्ह्यामध्ये बँकेचा अध्यक्ष असल्याकारणाने मी अनेक गोष्टी त्या ठिकाणी करू शकतो बँकेच्या माध्यमातून अनेक प्रकल्पांना सहाय्य करण्याचे काम आम्ही केले. मी हे माझ्या मोठेपणा सांगण्यासाठी सांगत नाहीत तर एका संस्थेची ताकद काय असते ते सांगण्याचा प्रयत्न करतोय की कोकण रेल्वे ज्या वेळेला होत होती त्यावेळेला बॉंड्स काढत होते आपल्या कोकण रेल्वेला पैशाची आवश्यकता होती त्यावेळेला मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेने १५० कोटी रुपये या कोकण रेल्वे करतानी पैसे होते . म्हणून देता आले संस्था होती म्हणून दिली राज्यातल्या कॉटन फेडरेशनला दिले होते का तर त्या कॉटन फेडरेशनच्या माध्यमातून राज्यातल्या कापूस उत्पादकांना त्या ठिकाणी पैसे मिळावे अनेक सहकारी साखर कारखान्यांना आपण पैसे देतो सूतगिरण्याला पैसे देतो हजारो कोटींची कर्ज आणि त्या ठिकाणी शिक्षण संस्था असतील राज्यातल्या सहकारी संस्थांना त्या ठिकाणी दिले संस्थांच्या माध्यमातून त्या तालुक्याचा त्या जिल्ह्याचा विकास त्या ठिकाणी होताना आम्ही त्या ठिकाणी पाहिलेला मगाशी ज्याचा उल्लेख केला की मी त्याचा ज्या ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी कल्पकतेने काम करत असतो मग जर आपण एखाद्या पदावर असून तर त्या पदाचा उपयोग जास्तीत जास्त लोकांना कसा होईल हा सातत्याने माझा . प्रयत्न असल्याचे प्रवीण दरेकर यांनी यावेळी प्रतिपादन केले

 

 

 

. यावेळी बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले की आज आपण वीरेश्वर मंदिराच्या सभागृहात आपण बसलो आहोत मला नेहमी दुःख होते की मी महाराष्ट्रातल्या सहकारी कारखान्यांना पैसे देतो सूतगिरण्यांना पैसे देतो शिक्षण संस्थांना पैसे देतो प्रक्रिया उद्योगांना कोट्यावधी रुपयाचा आपण कर्ज देतो माझ्या कोकणातला एकही माणूस येत नाही की प्रवीण भाऊ मला हा प्रकल्प करायचा आहे आम्हाला आपण त्या ठिकाणी मदत कराल का? आपला माणूस विचारात असतो डेरिंग करत नाही परंतु त्या ठिकाणी डेरिंग केल्याशिवाय आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जाता येत नाही गेल्याच महिन्यात आपण बघाल की मी पोलादपूरला एका मिनरल वॉटर च्या फॅक्टरी चा उद्घाटन केलं म्हणजे जॉब करणार असेल त्याला आपल्या ताकद देता येते मी विरोधी पक्ष नेते असताना एकदा पोलादपूरला दौऱ्यावर होतो आणि तेव्हा ते आमच्या कांदिवलीची चोरगे नावाचे ग्रस्त त्या ठिकाणी त्यांनी मुंबईचा आपला रूम विकला म्हाडाचा होता तो आणि जे काय त्याला ८०-९० लाख रुपये मिळाले त्याने इकडे येऊन साखर . गावात तिथे त्यांनी उद्योग चालू केला तर मी त्या ठिकाणी बघायला गेलो तर ती व्यक्ती आपला स्वतःच्या डोक्यावरती बाटल्या घेऊन एक जीप घेतली होती त्यात भरत होता कष्ट करत होता म्हणून विचारलं छोटा. व्यवसाय मोठा का नाही करत व माझ्याकडे पैसे आले तेवढे व्यवसाय उभा केला तर मी त्याला मुंबईला. बोलावले मोठा एक्सपान्शन चा प्लॅन कर मी त्याला मुंबईला बोलावलं बँकेच्या अधिकाऱ्यांना बोलावलं आमचा मेन सीजीएम आहे तो आपल्या पूर्वीचा सुर्वे त्यांना सांगितलं आपल्या गावाकडचा माणूस आहे आपल्याला मदत करायची तर ते आम्ही अधिकाऱ्यांबरोबर बसलो तर तुमच्या भाऊ माझ्याकडे काही मार्ग द्यायला काहीच नाही दोन कोटी रुपये त्याला द्यायचे होते त्याला कंपनी वाढवायची होती मी करण्यासाठी उपलब्ध करून देतो व तुम्हाला मोठे म्हणून सांगत नाही मी मुंबईतली माझी असणारी जागा मी बोललो तुम्ही मॉर्गेज ठेवा आणि माझ्या गावाकडच्या माणसांना दोन कोटी रुपये आपल्याला द्यायचे आहेत ते पैसे मी दिले त्यांनी आज कारखाना मोठा उभा केला मी त्या कारखान्यातच गेल्यास दहा दिवसापूर्वी त्या ठिकाणी उद्घाटन केले आणि नफ्यामध्ये कारखान्यात चाललंय आता काय माझी जागा काय पण घेऊन जाणार नाही आणि दुर्दैवाने गेली तरी एक माणूस माझ्या तालुक्यातला धाडस करतोय त्याच्यासाठी मी टोकाला जाऊन त्याच्या मागे त्या ठिकाणी उभा राहिलो असा तुमच्यासाठी आपल्या तालुक्यातल्या सगळ्या लोकांसाठी माझी करायची तयारी म्हणजे कारण त्या माध्यमातून तिथे आम्ही कृषी व आपल्याकडे प्रक्रिया करणारा कारखाना काढा मग फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लागेल किंवा एखादी सहकारी संस्था प्रक्रिया उद्योगांनी लागेल या दहा कोटीचा प्रकल्प केला तर सहा कोटी केंद्र सरकार देणार आहे

कोकण साठी मी त्या ठिकाणी देवदत्त पर्यटन व वाहतूक सहकारी संस्था ज्याचा कार्यक्षेत्र लाटणे साहेब संपूर्ण राज्याचे करून घेतले. एक जुनी संस्था होती फक्त रजिस्टर करून पर्यटन आणि वाहतूक केलाच काय तर काहीच केलं नाही मग माझ्या मनात आलं की ही पर्यटनाची संस्था आहे आपल्या कोकणला पर्यटनासाठी या संस्थेच्या माध्यमातून खूप काही करता येईल तुम्ही शेतात छोटे छोटे आपल्याकडे फार्म हाऊस आहेत कोकणला या संस्थेच्या माध्यमातून आणखी त्या ठिकाणी सहाय्य देऊन त्या ठिकाणी काय करता येईल पण ती संस्था आपण ऍक्टिव्हेट करतोय कोकणच्या मासेमारीला त्या ठिकाणी कोल्ड स्टोरेज असावेत चांगल्या प्रकारच्या. मच्छीमारांना बोटी घेण्यासाठी काय काय करता येतील याचाही प्रयत्न त्या ठिकाणी माझा निश्चितपणे सुरू आहे मी एकटा काय करता येईल ते करण्याचा माझ्या क्षमतेनुसार प्रयत्न करतोय आणि आता त्या सगळ्या गोष्टींना या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची प्रचंड अशा प्रकारची साथ त्याठिकाणी असल्यामुळे मी हे सगळं धाडस त्या ठिकाणी करतोय परंतु एकट्या प्रवीण दरेकर महाड पोलादपूरचा विकास करू शकत नाही कोकणचा विकास करू शकत नाही तर प्रत्येक तालुक्यातला प्रवीण दरेकर निर्माण झाला पाहिजे तर कोकणचा विकास सहकाराच्या माध्यमातून आपण प्रचंड ताकतीने त्या ठिकाणी करू शकू आणि त्याकरता जी होतकरू त्या ठिकाणची मुलं आहेत काय केवळ राजकारणात पक्षात जाऊन पंचायत समिती सदस्य होणे नगरसेवक होणे आमदार होणे याच्यातच सगळं नाही त्याचे अनेक महाराष्ट्रात लोक आहेत की ते कुठले लोकप्रतिनिधींनी झाले नाहीत परंतु त्यांनी जे काही काम उभा केलं ते जाऊनच ५०-१०० वर्ष त्यांची आठवण आपण त्या ठिकाणी काढत असतो आणि म्हणून मला वाटते की अशा प्रकारचं झोकून देऊन काम करणारी फळी आपल्या या तालुक्यामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि या कामे तुम्हाला जी मदत लागेल जी ताकत लागेल ते देण्यासाठी माझा शब्द आहे आपल्यातील लोक त्या ठिकाणी पुढे आली पाहिजेत एवढीच अपेक्षा या निमित्ताने . व्यक्त करतो असे प्रवीण दरेकर म्हणाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *