उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पात्र लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात सदनिकांच्या चाव्यांचे वाटप

 

मुंबई – महायुती सरकारच्या कार्यकाळात शासनाने हाती घेतलेल्या १०० दिवसांच्या अभियानात सहभागी झालेल्या ९५ महामंडळामध्ये सर्वाधिक गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल एसआरए प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.

शासनाने नुकतेच नवीन गृहनिर्माण धोरण मंजूर केले असून त्याअंतर्गत ३५ हजार घरे उभारण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. त्यासाठी ७० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असून या घरांची निर्मिती करण्याची मोठी जबाबदारी एसआरए प्राधिकरणावरही असणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना घरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे उद्दिष्ट यशस्वी करून दाखवण्यासाठी अधिक जोमाने काम करायला हवे अशी अपेक्षा याप्रसंगी बोलताना व्यक्त केली.

झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या वांद्रे येथील मुख्य कार्यालयात काही पात्र लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात सदनिकांच्या चाव्यांचे वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी एसआरए प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव नवीन सोना, आमदार दिलीप लांडे, शिवसेना विभागप्रमुख कुणाल सरमळकर, राजीव वजाळे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि एसआरए प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *