मुंबई : महानगरपालिकेच्या बी विभाग कार्यालयातील अनेक अभियंते तीन वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच विभागात एकाच जागी अनेक वर्ष खुर्चिला चिटकून बसल्यामुळे भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जात असल्याचा आरोप मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.अशा अभियंत्यांची बदली करण्याऐवजी आहे त्यांना एकाच विभागात कार्यत ठेवून मुख्यालयातील वरिष्ठ अधिकारी सुद्धा त्यांची मर्जी सांभाळत आहेत . अशा अभियंत्यां विरोधात तक्रारी प्राप्त झाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने थेट पालिका मुख्यालयातील नगर अभियंत्यांकडे तक्रार दाखल करून बदलीसह अभियंत्यांच्या चौकशीची मागणी केली आहे.
मनपा बी विभागात काही अभियंते ३ वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर देखील एकाच विभागात एकाच पदावर अनेक वर्ष कार्यरत राहून भ्रष्टाचार करत असल्याचा मनसेने आरोप केला आहे.कंत्राटदार तसेच भ्रष्टाचारी लोकांशी संबंध असल्याने बी विभागात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असल्याचे नगर अभियंता दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. अशा प्रकारच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्यामुळे मुंबा देवी मनसे विभाग प्रमुख प्रशांत गांधी यांनी पालिका मुख्यालयातील अभियंत्यांचे प्रमुख मुख्य नगर अभियंता राम कदम ह्यांना निवेदन सादर करून बी विभागात तीन वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत असणाऱ्या अभियंत्यान विषयी तक्रार दाखल करून बदलीची आणि त्यांच्या चौकशीची मागणी उचलून धरली आहे.
या तक्रारीत मनसेने खास करून बी विभागाच्या इमारत कारखाने खात्यात विशाल साखळकर नावाचा अभियंता २०१९ पासून एकाचा विभागात अनेक वर्ष कार्यरत राहून भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप केला आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतर मनसेने अभियंत्यांच्या बदलीची मागणी केली आहे. त्याचबरोबर आणखी तीन-चार कामचुकार अभियंत्यांची नावे तक्रारीत नमूद केली आहे. त्यांच्या बदलीची मागणी मनसेने केली आहे. सदर अभियंते मनपा बी विभागात अनेक वर्षापासून कार्यरत असल्यामुळे त्यांचा श्रीमंत व्यवसायिक, अवैध फेरीवाले,अनधिकृत बांधकाम करणारे ठेकेदार यांच्याशी घनिष्ठ संबंध असल्याचा आरोप मनसे कडन करण्यात आला आहे. अशा भ्रष्ट अभियंत्यांमुळे पालिकेची प्रतिमा मलिन होत असल्याने त्यांना दुसऱ्या प्रभागात नागरिकांची सेवा करण्याची संधी देण्यासाठी बदलीची व चौकशीची मागणी केली आहे.