चेंबूरमध्ये हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेची कारवाई l; ८ जण अटक, ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

 

मुंबई (सुधाकर नाडर ) – गोवंडी पोलिसांच्या कक्ष-६ गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे चेंबूर येथील ‘कर्मा’ हुक्का पार्लरवर छापा टाकून कारवाई केली.

ही कारवाई २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.१५ वाजता करण्यात आली. पोलिसांनी पार्लरचा मॅनेजर/कॅशियर, दोन वेटर आणि पाच ग्राहक अशा एकूण ८ जणांना अटक केली.

छाप्यात एकूण रु.३२,३८० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात रु.३,४०० रोख, रु.२३,८०० किमतीचे तंबाखू मिश्रित विविध फ्लेवर्स आणि रु.५,१८० किमतीची हुक्का साहित्य सामग्रीचा समावेश आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक सावंत यांच्या नेतृत्वाखाली झाली. पंचनाम्यानंतर सर्व आरोपी व जप्त माल पुढील कायदेशीर कारवाईसाठी गोवंडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

या प्रकरणी भा.दं.वि. कलम २८७, १२५, २२३, ३(५) तसेच सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थ कायदा २००३ (सुधारणा अधिनियम) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *