पंडित दीनदयाल उपाध्याय यांची स्वप्ने पूर्ण करा- ॲड.रवी व्यास
भाईंदर. अखंड मानवतावादाचा संदेश देणारे भारतीय जनसंघाचे नेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथी निमित्त भाईंदर पश्चिम येथील भाजपा जिल्हा कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला आदरांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना भाजपा १४५ विधानसभा निवडणुक प्रमुख ॲड.रवी व्यास म्हणाले की, पंडितजींनी देशाच्या स्वावलंबनाचे आणि सुवर्ण विकासाचे सोनेरी स्वप्न पाहिले होते. त्यांच्या विचारधारेवर आधारित अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. ते कट्टर राष्ट्रवादी आणि हिंदुत्व चेतनेचे जागृत संरक्षक होते. त्यांचे आदर्श आचरणात आणून आपण सर्व शक्तिमान समाज घडवू शकतो. यावेळी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पंकज (दरोगा) पांडे, मा.नगरसेवक सुरेश खंडेवाल तसेच राजीव प्रियदर्शी, महेंद्र मौर्य, संग्राम सिंग, सूरजभान गौड, सजीव चव्हाण, निरंजन मौर, महेंद्र गुजर, विठ्ठल नावंदर यांच्यासह भाजप चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.