मुंबई – माझगाव ताडवाडी येथील बीआयटी चाळीच्या गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या पुनर्विकासाबाबत मुख्यमंत्री यांच्याकडे बैठक घ्यावी अशी विनंती सरकारला केली.
आज सभागृहात विधानपरिषद सदस्य शशिकांत शिंदे यांनी माझगाव ताडवाडी येथील बीआयटी चाळीच्या रखडलेल्या पुनर्विकासाबाबत लक्षवेधी उपस्थित केली. या चर्चेत सहभाग घेत आ. दरेकर म्हणाले की, आज १५-२० वर्ष लोकं बाहेर आहेत. आमदार मनोज जामसूतकर यांना घेऊन राज्याच्या मुख्यमंत्री यांना भेटलो. मुख्यमंत्री यांनी जामसूतकर यांना आश्वस्त केले आहे. बैठक लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये पॉलिसी निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. मुख्यमंत्री यांची बैठकच आग्रह करुन घेतली तर हा विषय तात्काळ मार्गी लागेल. महापालिका पुनर्विकास करतेय. लोकांचा शासनाच्या एजन्सीवर विश्वास आहे. अभ्यूदय नगरला सीअँडडी करतोय त्याचप्रमाणे सरकारी एजन्सी येथे विकासक म्हणून नेमून लोकांना विश्वासात घ्यावे. यावर उत्तर देताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, याबाबत बैठक घेण्यात येणार असून बैठकीतून प्रश्न सुटू शकतात, असे सांगितले.