महाड नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विरुद्ध शिवसेना शिंदे गट कार्यकर्त्यांमध्ये राडा!!

महाड (प्रतिनिधी) स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात रायगड जिल्ह्यातील महाड नगर परिषदेच्या निवडणुकीत मतदानाच्या वेळी प्रभाग क्रमांक दोन व तीन च्या मतदान केंद्राबाहेर शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी होऊन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या फोडण्यापर्यंत वाद झाल्याने महाडमध्ये मोठ्या प्रमाणावर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की महाड मधील जुन्या स्टेट बँकेजवळ असणाऱ्या प्रभाग क्रमांक दोन व तीन मधील मतदान केंद्राबाहेर सकाळपासून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मतदानासाठी गर्दी केली होती मतदानासाठी जाणारे मतदार वगळता बाहेरून आलेल्या मोठ्या प्रमाणावर नागरिकांमुळे मतदानात व्यस्त येत असल्याने त्यांना दूर करण्याची मागणी सकाळपासूनच पोलीस यंत्रणेकडे करण्यात येत होती मात्र पोलिसांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने हा वाद वाढल्याचे उपस्थित असलेल्या जनसमुदायाकडून बोलले जात होते.

मारहाणीची व वादाची घटना पोलिसांसमोरच होत असताना पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र देखील प्रत्यक्ष दर्शनी असणाऱ्या व्यक्तींकडून उघडपणे बोलले जात होते कालपासूनच महाडमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने दाखल होते– स्नेहल जगताप
शिवसेना युवा नेते विकास गोगावले यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न विकास गोगावले आज सकाळपासून महाड शहरांमधील नगर परिषदेच्या निवडणुकीला दुपारी सव्वा च्या सुमारास गालबोट लागल्याचे दिसून आले नवे नगर शाळा क्रमांक पाच येथील मतदान केंद्र बाहेर शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना नेते विकास गोगावले व त्यांचे कार्यकर्ते आज आले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश उपाध्यक्ष सुशांत झांबरे व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विकास गोगावले यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. यासंदर्भात आपल्यावर रोखण्यात आलेले रिवाल्वर त्यांनी जप्त केले असून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती दिली आहे. दरम्यान हे वृत्त समजतात पोलिसांनी तातडीने परिसरामध्ये बंदोबस्त वाढवला असून रॅपिडक्शन फोर्स ची तुकडी दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान या संदर्भात राष्ट्रवादीच्या विधानसभा नेत्या स्नेहल जगताप यांनी सोमवारी रात्रीपासूनच शिवसेनेचे कार्यकर्ते शहराच्या विविध भागात दाखल झाल्याची माहिती देऊन झालेला प्रकार हा जाणीवपूर्वक केल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान पोलीस प्रशासनाने या परिसरासह शहरातील बंदोबस्तात वाढ केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *