महाडमध्ये परस बागेत गांजाची शेती; पोलिसांकडून कारवाई करत शेती केली उध्वस्थ

महाड (मिलिंद माने) महाड तालुक्यातील मोहोत गावामध्ये एका व्यक्तीने परसबागेत गांजाची लागवड केल्याचे पोलिसांना समजले. यावरून या ठिकाणी पोलिसांनी कारवाई करून गांजाची शेती उध्वस्थ केली आहे व संबंधित आरोपीला अटक केली आहे.

 

याबाबत एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महाड तालुक्यातील मोहोत या गावातील श्याम सिताराम भिसे, रा. भिसे वाडी वय ६१ याने . राहत्या घराशेजारील परसबागेत अमली पदार्थाच्या गांजा या पिकाची लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याप्रकरणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या पथकाने आज १९ मे रोजी दुपारी ३:०० वाजता या ठिकाणी छापा टाकून पाच ते सहा फूट उंचीच्या हिरव्या रंगाची पाने असलेली उग्र वासाची ओलसर कांद्याची 16 झाडे व त्या झाडांचे कापणी तुकडे करून पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिकच्या कोठ्यात वजन केले असे एकूण वजन २ किलो ४८ ग्रॅम निव्वळ गांजाचे वजन १ किलो ९८८ ग्रॅम एकूण मिळून ५०,००० च्या मुद्देमाला सकट गांजाचे पिक उध्वस्त केले आहे.

 


याप्रकरणी आरोपी विरोधात गुंगीकारक औषध द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ क, २० ब, २० ब २ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

 

गांजाची शेती करणाऱ्या वर कारवाई झाली मात्र. महाड तालुक्यात ज्या ज्या अनधिकृत टपऱ्यांवर गुटख्याच्या नावाखाली सर्रासपणे गांजा विक्री केली जाते त्यांच्यावर काय कारवाई करणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे महाड तालुक्यातील विन्हेरे विभागात तसेच खाडीपट्ट्यात व दादली पुलाजवळील व नातेखिंडीतील आणि महाड एमआयडीसीतील अनेक टपऱ्यांवर गांजा विक्री होत असताना देखील पोलिसांनी याबाबत का कारवाई केली नाही असा अहवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *