कोरेगाव पार्क जमीन व्यवहारात मोठा घोटाळा?; मुद्रांक शुल्क चुकविल्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली!

 

पुणे | प्रतिनिधी : कोरेगाव पार्क परिसरातील एका चर्चित जमीन खरेदी-विक्री व्यवहारात मोठ्या प्रमाणावर मुद्रांक शुल्क चुकविल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, या प्रकरणी राज्य शासनानं तत्काळ हालचाल केली आहे.

नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक सुहास दिवसे यांच्या आदेशानुसार सह नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक अधीक्षक (मुख्यालय), पुणे राजेंद्र मुठे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती नेमण्यात आली आहे.

या समितीला प्रकरणाची सखोल चौकशी करून सविस्तर अभिप्रायासह अहवाल पुढील सात दिवसांत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अधिकृत सूत्रांनुसार, संबंधित व्यवहारात बाजारमूल्याच्या तुलनेत कमी रकमेवर नोंदणी करून शासकीय महसुलाला मोठ्या प्रमाणावर तोटा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

दरम्यान, नोंदणी विभागाने संबंधित व्यवहाराशी निगडित सर्व कागदपत्रे आणि कर तपशील मागवले असून, लवकरच चौकशीस प्रारंभ होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *