अंबरनाथ काँग्रेसला मोठा धक्का; १२ नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

 

नवी मुंबई | प्रतिनिधी : अंबरनाथ नगर परिषदेतील काँग्रेसला आज मोठा धक्का बसला. काँग्रेसचे १२ नगरसेवकांनी नवी मुंबई येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी वन मंत्री गणेश नाईक, संजीव नाईक, दीपेश म्हात्रे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांचे स्वागत करत भाजपची विकासाभिमुख भूमिका आणि संघटनात्मक ताकद यामुळेच हा प्रवेश झाल्याचे सांगितले. अंबरनाथ शहराच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध असून येणाऱ्या काळात नगरपरिषदेत भाजप अधिक सक्षमपणे काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांची नावे पुढीलप्रमाणे आहेत —

१) प्रदीप नाना पाटील

२) दर्शना उमेश पाटील

३) अर्चना चरण पाटील

४) हर्षदा पंकज पाटील

५) तेजस्विनी मिलिंद पाटील

६) विपुल प्रदीप पाटील

७) मनीष म्हात्रे

८) धनलक्ष्मी जयशंकर

९) संजवणी राहुल देवडे

१०) दिनेश गायकवाड

११) किरण बद्रीनाथ राठोड

१२) कबीर नरेश गायकवाड

या प्रवेशामुळे अंबरनाथ नगरपरिषदेत भाजपची ताकद वाढली असून, स्थानिक राजकारणात नव्या घडामोडींना वेग येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *