वडाळा टीटी पोलिसांची मोठी कारवाई – ५१ किलो गांजासह दोन जण अटक

 

मुंबई – वडाळा टीटी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने गस्तीदरम्यान मोठी कारवाई करत दोन गांजा विक्रेत्यांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून तब्बल ५१ किलो ५०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे रु.१०.३० लाख आहे. ही कारवाई २२ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २:४० वाजता करण्यात आली. पांढऱ्या रंगाच्या वॅगनआर (MH 01 EE 3013) कारवर संशय आल्याने पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने पळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी शिताफीने कार अडवून तपासणी केली असता गांजा आढळून आला.
या प्रकरणी अबुबकर मेहंदीहसन शान आणि शहबाज शमीम खान यांना अटक करण्यात आली असून वडाळा टीटी पोलीस ठाण्यात गु.र.क्र. ५५९/२०२५ कलम ८(क), २०(ब)(२)(क), २९ एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपींना २५ ऑगस्ट २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदर प्रकरणाचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती
मा. पोलीस सह आयुक्त कायदा व सुव्यवस्था श्री. सत्यनारायण चौधरी
मा. अपर पोलीस आयुक्त मध्य प्रादेशिक विभाग श्री. विक्रम देशमाने
मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ – ४ माटंगा मुंबई श्रीमती रागसुधा आर
मा. सहायक पोलीस आयुक्त सायन विभाग श्री. शैलेंद्र धिवार,
मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वडाळा टी. टी. पोलीस ठाणे चंद्रकांत सरोदे
व पोलीस निरीक्षक अनुराधा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाच े पोलीस उपनिरीक्षक किरण नवले, पोलीस उपनिरीक्षक माधवेंद्र येवले, पुलिस हवलदार धनंजय जाधव, अजुमुद्दीन मिर, संपत गोसावी, रविंद्र ठाकुर, रमेश कुटे,पुलिस शिपाई बाप ु पाटोळे, पराजू शिंदे, रणजित चौधरी, आनंद भोसले, विजय हनुमंते, नबीलाल बोरगावकर, शफीक शेख, रमेश बोरसे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *