मिरारोड – गणेशोत्सवास एक दिवस राहिला असताना असताना मिरा-भाईंदर शहरातील प्रमुख रस्त्यांची झालेली दुर्दशा आणि मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे नागरिकांच्या जिवाशी खेळत आहेत. शहरातील रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेता ‘संग्राम सामाजिक संस्था’ यांनी मिरा-भाईंदर महापालिकेला इशारा दिला होता की दि. २७ ऑगस्ट २०२५ रोजी येणाऱ्या गणेशोत्सवापूर्वी सर्व प्रमुख रस्त्यांवरील खड्डे तातडीने न बुजविल्यास, संस्थेच्या वतीने २६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता दहिसर चेकनाका, पेणकरपाडा येथील वाहतूक पोलिस चौकीजवळ ‘भिकमांगो आंदोलन’ करण्यात येणार आहे.
संस्थेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील अनेक रस्ते अत्यंत खराब अवस्थेत आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वृद्ध, महिला, विद्यार्थी व दुचाकीस्वारांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. गणेशोत्सवाच्या काळात शहरातील रस्त्यांवर भक्तांची मोठी गर्दी असते. मिरवणुका, विसर्जन मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमां दरम्यान या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढू शकते, त्यामुळे ही बाब सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर आहे.
संग्राम सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास निकम म्हणाले की, “गणपती बाप्पांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु आहे, पण प्रशासनाचे दुर्लक्ष नागरिकांच्या जिवावर बेतू शकते. जर प्रशासनाकडे रस्ते दुरुस्तीसाठी पैसे नसतील, तर आम्ही रस्त्यावर भिक मागून ती रक्कम गोळा करू व त्यातून खड्डे बुजवू. ही लाजिरवाणी परिस्थिती प्रशासनाच्या निष्क्रियतेचे परिणाम आहेत.”
संस्थेने प्रशासनाला इशारा दिला होता की, रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून गणेशोत्सवाच्या आधी सर्व खड्डे बुजवावेत, विशेषतः विसर्जन मार्गावरील रस्त्यांना प्राधान्य देण्यात यावे. अन्यथा २६ ऑगस्ट रोजी नियोजित ठिकाणी ‘भिकमांगो आंदोलन’ करावे लागेल परंतु महापालिका प्रशासनाने त्यांचा आंदोलनाच्या दखल घेतली नाही.मिराभाईंदर मध्ये रस्त्यावर खड्डे अजूनही आहेत.ह्या खड्यातूनच श्री गणेशाची मुर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ घेऊन जात आहे त्यामुळे गणेश भक्तांना खड्यांचा त्रास होत आहे व वाहतुकीस अडथळा ही होत आहे.
श्री गणेशाचे आगमन होत असताना
गणेशोत्सवपूर्वी मिरा भाईंदर शहरातील खड्डे मिरा भाईंदर महानगरपालिका प्रशासनाने न बुजविल्यामुळे मिरा भाईंदर महानगरपालिका प्रशासनाचा जाहीर निषेध म्हणून संग्राम सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास निकम व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने दहिसर चेक नाका पेणकरपाडा वाहतूक पोलीस चौकी जवळ आज भीक मांगो आंदोलन करण्यात आले.