अनुश्री भोसलेला महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, जळगाव येथे ३१ जुलै ते ३ ऑगस्टदरम्यान पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत मुंबईच्या अनुश्री विनोद भोसले हिने कैंडेट क्लास (१३ वर्षाखालील) गटात चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.

अनुश्री ही माहिम येथील सरस्वती विद्यामंदिर शाळेत इयत्ता ७ वीमध्ये शिक्षण घेत आहे. तिची मोठी बहीणही बॉक्सर असून तिच्या पावलावर पाऊल ठेवत अनुश्रीनेही बॉक्सिंगमध्ये पाऊल ठेवले. ती सध्या दादर येथील वीर सावरकर क्लबमध्ये राजन जोथाडी सरांकडून प्रशिक्षण घेत आहे.

बॉक्सिंगसारख्या साहसी आणि शारीरिक क्षमतेची गरज असलेल्या खेळात मुलीही यशस्वी होत आहेत, हे अनुश्रीच्या यशातून स्पष्ट होते. अशा होतकरू खेळाडूंना त्यांच्या शाळा, प्रशिक्षक, व पालक यांचे अधिक सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *